कोणी साकारला देखावा?
गणेशोत्सवाला विचारांची परंपरा जोपासली जावी,या हेतूने वंदनीय साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवजयंती वर्ष निमित्ताने जालना शहरातील हरिओमनगरातील सुहास सदावर्ते आणि त्यांच्या कुटूंबीयाने ' गुरुजींचा बाप्पा ' साकारला आहे. साने गुरुजींचे जन्मस्थान,पंढरपूर मंदीर अन्नत्याग उपोषण यासह ' श्यामची आई ' या ग्रंथातील विविध आशयांच्या ' चित्रकथा' आधारित देखावा मांडण्यात आला आहे. या देखाव्याची संकल्पना सुहास सदाव्रते यांची असून सुयोग सदाव्रते, सायली सदाव्रते यांनी सजावट आणि मांडणी केली आहे.
advertisement
एकविरा आईचं मंदिर कुर्ल्यात, गणेशभक्तानं साकारला हुबेहुब देखावा, Video
अध्यापन कार्य, समाजसेवा, स्वातंत्र्ययुध्द अशा बहुविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे साने गुरुजी. मातृभूमीच्या सेवेसाठी नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यसमरात त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सुखासाठी झटत राहिले. समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, एकता निर्माण व्हावी, शेतकरी-कामकरी वर्गाचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे आणि सर्वत्र समाजवादाची स्थापना व्हावी या हेतूने ते सर्वत्र जनजागृती करत राहिले. लहान मुले, स्त्रिया, तरुण, दीन-दलित यांना स्वत्त्वाची जाणीव व्हावी आणि उत्तमोत्तम विचारांची देणगी मिळावी यासाठी अत्यंत संस्कारक्षम असे साहित्य त्यांनी निर्माण केले.
आज साने गुरुजींसारखे उदात्त व्यक्तिमत्त्व आपल्यामध्ये नसले तरीही त्यांचा हा साहित्यरूपी अनमोल ठेवा आपल्याकडे आहे. अत्यंत सोप्या भाषेतील या बोधप्रद कथा, वैचारिक लेख, इतर भाषांमधील महान लेखकांचे अनुवादित साहित्याने विचारांची दिशा बदलत आहे. प्रत्येक घर गुरुजींच्या विचारांनी पावन व्हावे, हीच एकमेव इच्छा. यासाठीच आमचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे सुहास सदावर्ते यांनी सांगितले.
नागपूरकरांना अनुभवता येणार स्वराज्याची राजधानी, देखाव्यातून मांडला शिवरायांचा इतिहास
यंदाचे वर्ष हे वंदनीय साने गुरुजी यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे. गुरुजींचे विचार आजच्या डिजिटल जमान्यातील युवापिढीला कळावे. या हेतूने आम्ही यंदा साने गुरुजींच्या सुसंस्कार विचारधारेवर आधारित देखावा तयार केला आहे, असं आरती सुहास सदाव्रते यांनी सांगितले.





