जालना : राज्य सरकारने नुकताच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे आहे. मात्र, यासाठी शेतकऱ्यांनी 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे तुम्ही 2023-24 या वर्षांमध्ये पाहणी केलेली आहे किंवा नाही हे अत्यंत सोप्या पद्धतीने पाहू शकता. यासाठी तुम्हाला केवळ 15 रुपयांचा खर्च येणार आहे. हे नेमके कशा पद्धतीने पाहायचे, हेच आपण जाणून घेऊयात.
advertisement
यासाठी सगळ्यात आधी तुम्ही गुगल क्रोम ब्राउझरवर जाऊन डिजिटल सातबारा असे टाईप करावे. यानंतर आलेल्या पहिल्याच लिंकवरती क्लिक करावे. त्यानंतर ओटीपी बेस्ड लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर मोबाईल क्रमांक टाकून सेंड ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करावे. यानंतर तुम्हाला 6 अंकी ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी टाईप करून व्हेरिफाय ओटीपी ऑप्शनवर क्लिक करावे.
यानंतर तुमच्या समोर एक नवा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर रिचार्ज अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करावे. यानंतर आपणास बँकेच्या पोर्टलकडे पाठवत आहे, असा मेसेज दिसेल. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा कोडचा वापर करून किंवा यूपीआय आयडी टाईप करून किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातूनही पेमेंट करू शकता.
15 रुपयांचे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे आहे. बॅक आल्यानंतर पुन्हा एकदा मोबाईल क्रमांक टाकून करून ओटीपी टाईप करून साईट लॉगइन करावी. यानंतर तुम्हाला साइटवर खाली जिल्ह्याचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे येतात. यामध्ये तुमचा जिल्हा क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली तालुक्याचा ऑप्शन येतो. या ठिकाणी तुमचा तालुका सिलेक्ट केल्यानंतर खाली पुन्हा तुमच्या गावाचा ऑप्शन येतो.
Independence Day 2024 : आजही भारतीय रेल्वे करतेय इंग्रजांच्या या नियमाचं पालन, पण काय आहे कारण?
तुमच्या तालुक्यातील सर्व गावांची नावे या ऑप्शनमध्ये येतात. तुमचे शेत ज्या शिवारात आहे त्या गावाचे नाव इथे सिलेक्ट करायचं. यानंतर तुमच्या शेताचा गट क्रमांक खाली दिलेल्या ऑप्शनमध्ये टाकावा. पुन्हा एकदा खाली असलेल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही टाकलेला सर्वे क्रमांक बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी आणि मग त्यावर क्लिक करावे. यानंतर येणाऱ्या पॉप मेसेजला ओके करावे.
यानंतर तुमच्या पुढे तीन प्रकारचे ऑप्शन दिसतील. त्यापैकी पहिलाच ऑप्शन असलेल्या मागील तीन वर्षांचा ई पीक पाहणी अहवाल यावरती तुम्ही क्लिक करावे. यानंतर आलेल्या डाऊनलोड टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा सातबारा डाऊनलोड होईल. या सातबाऱ्यावर मागील तीन वर्षांची पिक पाहण्याची नोंद असेल. तर अशा पद्धतीने शेतकरी 2023 या वर्षांमध्ये ई पीक पाहण्याची नोंद केलेली आहे की नाही, याबाबतची माहिती मिळू शकतात.