Haj Yatra 2024 : हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू, शेवटी तारीख काय, नेमका कसं अप्लाय कराल, संपूर्ण माहिती..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
इच्छुक हाजी लोकांनी लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या दिलेल्या वेबसाइटवर ऑनलाइन फॉर्म भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव हज यात्रा करण्यासाठी सौदी अरेबियातील मक्का येथे जातात. त्यामुळे 13 ऑगस्टपासूनच हज 2025 यात्रेसाठी कमिटी ऑफ इंडिया, मुंबईच्या संकेतस्थळ ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू झाली आहे. ज्या व्यक्तींना हज यात्रेला जायचे आहे, ते व्यक्ती 9 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. याबाबत सोलापूर हज कमिटीचे सदर उस्मान जमादार यांनी लोकल18 च्या टीमशी बोलताना अधिक माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, हज यात्रेसाठीचे ऑनलाइन अर्ज हज कमिटी ऑफ इंडियाच्या http://hajcommittee.gov.in या संकेतस्थळावर किंवा हज सुविधा मोबाइल अॅपवरून अर्ज करता येऊ शकतात. 13 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीमध्ये इच्छुकांनी अर्ज भरावे. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आंतरराष्ट्रीय पासपोर्ट त्याची व्हॅलिडीटी 15 जानेवारी 2025 पर्यंत असावी.
Independence Day 2024 : आजही भारतीय रेल्वे करतेय इंग्रजांच्या या नियमाचं पालन, पण काय आहे कारण?
अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, ब्लड ग्रुप, फोटो, ब्लॅक चेक, नॉमिनीची माहिती देण्यात यावी. 65 वर्षांवरील लोकांसाठी राखीव कोटा आहे. त्यासाठी कॅम्पेनियनचे वय 18 पासून 60 पर्यंत असतील. एका कव्हर नंबरमध्ये पाच लोक असतील. तसेच पाच वरिष्ठ, दोन मुले असा भरता येईल. इच्छुक हाजी लोकांनी लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या दिलेल्या वेबसाइटवर ऑनलाइन फॉर्म भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
बालविवाह रोखण्यासाठी केली चॅम्पियनची नेमणूक, छत्रपती संभाजीनगरमधील हा अनोखा उपक्रम तरी काय?
ऑनलाइन फॉर्म भरताना काही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी सोलापूर हज कमिटी युनूस शेख (09422461648), अल्ताफ सिद्दिकी (09421022133), उस्मान जमादार सर (09960539855), अमान (09271263446) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
August 15, 2024 1:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Haj Yatra 2024 : हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू, शेवटी तारीख काय, नेमका कसं अप्लाय कराल, संपूर्ण माहिती..