नेमकं घडलं काय?
पुनर्वसनासाठी शासनाकडून संपादित जमिनीचा मोबदला म्हणून सरकारकडून तक्रारदाराला 1 कोटी 88 लाख रुपये मिळणार होते. ही रक्कम वर्ग करण्यासाठी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता रोहित देशमुखने मोठ्या रकमेची मागणी केली. शेवटी 7 लाख रुपयांची लाच घेऊन पैसे वर्ग करण्याची तयारी दाखवली. त्यासाठी पहिल्या हप्त्यात 4 लाख रुपये आधीच घेतले.
advertisement
घरी बायको-पोरं, तरी बाहेर लफडं, मुंबईतील प्रेयसीनं घरी बोलवून गुप्तांगच कापलं, मग...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार
गावठाण घराच्या संपादनाचा शासकीय मोबदला मिळण्यासाठी अडव्हान्स म्हणून तक्रारदाराच्या सहीचे कोरे चेक घेतले होते. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने सुरुवातीला 4 लाख रुपयांची लाच दिली. त्यानंतर पैसे वर्ग झाले. मात्र, लाचेची उर्वरित रक्कम मागितल्यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीवर वाटूर फाटा इथे 30 डिसेंबर रोजी पडताळणी करण्यात आली.
लाचलुचपतचा सापळा
1 जानेवारी रोजी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात एलसीबीकडून सापळा रचण्यात आला. रोहित देशमुख यांच्या दालनात तक्रारदार यांनी टिफिन ठेवण्याच्या पिशवीत रक्कम ठेवून सात लाखाचा व्यवहार फायनल झाल्याचे सांगितले. देशमुख यांनी 'हो' म्हणून संमती दर्शवली. तक्रारदार यांनी इशारा करताच कार्यकारी अभियंत्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी 50 हजारांच्या चलनी नोटा आणि 50 हजार रुपयांच्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच अंगझडतीत 9 हजार रुपये रोख, ॲपल कंपनीचा मोबाईल इत्यादी जप्त करण्यात आले.






