TRENDING:

Bombay Blood: ...अन् रक्त घेऊन विमानाचं उड्डान, जालन्यातून थेट तिरुपतीला पाठवलं बॉम्बे ब्लड!

Last Updated:

Bomby Blood: अत्यंत दुर्मिळ मानलं जाणारं बॉम्बे ब्लड ग्रुपची पिशवी जालन्यातून तिरुपतीला पाठवण्यात आली. विशेष म्हणजे हे अत्यंत दुर्मिळ रक्त विमानाने पाठवण्यात आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: तंत्रज्ञान आणि वेगवान सेवांमुळे हल्ली अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील सहजशक्य झाल्या आहेत. मग एखादा अवयव एका शहरातून अवघ्या काही तासांत दुसऱ्या शहरात पाठवून यशस्वी ट्रान्सप्लांट करणे असो की एखादी अशक्य वाटणारी सर्जरी होणे असो. जालना शहरातून नुकतीच अशीच घटना समोर आली आहे.
Bombay Blood: ...अन् रक्त घेऊन विमानाचं उड्डान, जालन्यातून थेट तिरुपतीला पाठवलं बॉम्बे ब्लड!
Bombay Blood: ...अन् रक्त घेऊन विमानाचं उड्डान, जालन्यातून थेट तिरुपतीला पाठवलं बॉम्बे ब्लड!
advertisement

जालना येथून बॉम्बे ब्लड ग्रुप या दुर्मिळ रक्तगटाची पिशवी तिरुपतीकडे रवाना करण्यात आली. आंध्र प्रदेशातून या रक्तगटाची मागणी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून विमानाने ही रक्तपिशवी पाठविण्यात आली.

जालना येथील जनकल्याण रक्तकेंद्राच्या माध्यमातून मुंबईतील राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. यानंतर मुंबईतील थिंक फाउंडेशनचे विनय शेट्टी यांनी जनकल्याण रक्तकेंद्राचे जनसंपर्क अधिकारी शिवराज जाधव यांच्याशी संपर्क साधला.

advertisement

इथल्या चुलीवर कधीच शिजलं नाही मटण, महाराष्ट्रातील शुद्ध शाकाहारी गाव माहितीये का?

जालन्यातून पहिल्यांदाच पाठवली रक्त पिशवी

बॉम्बे ब्लड ग्रुप हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट असून, संपूर्ण भारतात अशा रक्तदात्यांची संख्या अत्यल्प आहे. महाराष्ट्रातून तिरुपतीपर्यंत अशी रक्तपिशवी पाठवली जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

तिरुपतीसाठी संपर्क साधून आवश्यक रक्त उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधला. त्यानंतर शुक्रवारी जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने ही रक्तपिशवी अधिकृतरीत्या रक्षणा ब्लड स्टोरेज सेंटर, तिरुपती येथे रवाना करण्यात आली.

advertisement

बॉम्बे ब्लड ग्रुप

बॉम्बे ब्लड ग्रुप (Hh रक्तगट) हा एक अत्यंत दुर्मिळ रक्तगट आहे. यामध्ये लाल रक्तपेशींवर सामान्य 'A' किंवा 'B' प्रतिजन नसतात, कारण या रक्तगटात 'H' प्रतिजनही नसतो, जो 'A' आणि 'B' प्रतिजन तयार करण्यासाठी आवश्यक असतो. हा रक्तगट प्रथम 1952 मध्ये मुंबईत (तेव्हा बॉम्बे) शोधला गेला, म्हणून त्याला हे नाव मिळाले.

advertisement

बॉम्बे ब्लड ग्रुपची वैशिष्ट्ये

दुर्मिळता: हा रक्तगट खूप दुर्मिळ आहे आणि जगभरातून 10,000 लोकांमध्ये केवळ एका व्यक्तीमध्ये आढळतो.

प्रतिजन (Antigens): या रक्तगटाच्या लाल रक्तपेशींवर A, B आणि H प्रतिजन नसतात.

रक्तदान: सामान्य चाचणीमध्ये हा रक्तगट O रक्तगटासारखा दिसतो, कारण त्यात A आणि B प्रतिजन नसतात. मात्र, 'H' प्रतिजन नसल्यामुळे तो O रक्तगटापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे, बॉम्बे ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीला फक्त बॉम्बे ब्लड ग्रुपचेच रक्त दिले जाऊ शकते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

शोध: 1952 मध्ये डॉ. वाय. एम. भेंडे यांनी मुंबईत प्रथम हा रक्तगट शोधला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Bombay Blood: ...अन् रक्त घेऊन विमानाचं उड्डान, जालन्यातून थेट तिरुपतीला पाठवलं बॉम्बे ब्लड!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल