TRENDING:

जालना शहरातील अवजड वाहतूक थांबणार, अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय

Last Updated:

Jalna News: सततच्या वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमवर जालन्यातील प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील अवजड वाहतूक थांबवण्यात येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: गेल्या काही काळापासून जालना शहरातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे. सततची वाहतूककोंडी आणि अपघात रोखण्यासाठी आता प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जालना जिल्हा प्रशासन, रेल्वे अधिकारी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये शहरातून वाहतूक होणाऱ्या अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्ते बांधण्यावर महानगरपालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये सहमती झाली आहे. शहरातील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या शेडकेडे शहरातून येणारी अवजड वाहने पर्यायी मार्गाने यावेत यासाठी नवीन रस्त्यांचे बांधकाम करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने रेल्वे आणि महानगरपालिकेला दिले आहेत.
जालना शहरातील अवजड वाहतूक थांबणार, अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय
जालना शहरातील अवजड वाहतूक थांबणार, अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय
advertisement

जालना शहरातून अवजड वाहनांची विशेषतः रेल्वे मालवाहतूक शेडकडे जाणारी वाहनांची वर्दळ ही वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमुख कारण आहे. या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय स्थानिक रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला. जालना शहरातील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्नदोरे यांनी सातत्याने जालना शहरातून होत असलेल्या अवजड वाहतच्या धोक्याविषयी जिल्हा प्रशासनाला सूचित केले होते. तसेच शहरातून मालवाहतूक करणारी अवजड वाहने अपघातांचे प्रमुख कारण ठरत असल्याने ती बंद करण्याची मागणी केली होती.

advertisement

मराठवाड्यात ठेवीदारांना 350 कोटींचा चुना, चंदुलाल पोलिसांच्या ताब्यात, पुढे काय?

असा असेल पर्यायी मार्ग

अतिरिक्त जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये असा निर्णय करण्यात आला की रेल्वे विभाग रेल्वेच्या जमिनीवर मालवाहतूक शेड पासून अंतर्गत रस्ते बांधेल. तर जालना महानगरपालिका उर्वरित रस्त्यांचे नेटवर्क विकसित करेल. त्यामुळे मालवाहतूक ट्रकना शहरातून न जाता अंबड उड्डाणपूलापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.

advertisement

लवकरच बांधणार पर्यायी मार्ग

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

रेल्वे आणि जालना महानगरपालिका लवकरच रस्ते बांधणी पूर्ण करण्यासाठी सहकार्य करतील या उपायोजनांमुळे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपघात लक्षणेरीत्या कमी होऊन वाहनांची वाहतूक सुगम होईल आणि रहिवाशांसाठी सुधारित सुरक्षा निश्चित होईल परंतु या प्रस्तावाला अंमलबजावणी पूर्वी वरिष्ठ अधिकारी यांची मंजुरी आवश्यक असेल, असं महानगरपालिकेचे प्रशासक दीपक इंगोले यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जालना शहरातील अवजड वाहतूक थांबणार, अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल