न्युज १८ लोकमतशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण केल्याने महायुतीला विधानसभा निवडणुकीत यश मिळणार आहे. महायुतीला १८० ते १८५ जागा मिळणार असा दावा देखील रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच भाजप बंडखोरांना शांत करण्यात यश आल्याची माहिती देखील दानवेंनी यावेळी दिली आहे.
दरम्यान रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे भोकरदन आणि मुलगी संजना जाधव कन्नड मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण त्यांच्या प्रचाराला आपण जाणार नाही,अशी माहिती देखील दानवेंनी दिली आहे.
advertisement
याचसोबत लोकसभेला जरांगे फॅक्टर खुप निर्णायक ठरला होता. विधानसभेत जरांगे फॅक्टर कसा निर्णायक ठरतो? याकडे सर्वांचे लक्ष आहे.अशात मनोज जरांगे निवडणुकीतून माघारी घेतली आहे.या माघारीवर देखील दानवेंनी भाष्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयामुळे आमच्या आकड्यात वाढ झाली तर आम्हाला फायदा नक्की होईल आणि आमचा आकडा कमी झाला तर आम्हाला फटका देखील बसणार आहे.पण हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता लोकसभेला निर्णायक ठरलेला जरांगे फॅक्टर विधानसभेत चालतो का? महायुती किती जागा जिंकणार? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
