नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
आजापासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. पोलीस स्टेशनला अर्ज द्या, म्हणजे सरकारला कळेल आपले उपोषण सुरू झाले आहे. आपली एकजूट असू द्या, आपल्याला आरक्षण नक्की मिळेल. दरम्यान शनिवारी देखील मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. उद्यापासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे, ज्या गावांत साखळी उपोषण सुरू आहे, तिथे आमरण उपोषणाला सुरुवात करा असं आव्हान या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं.
advertisement
जरांगे पाटलांची प्रकृती खालावली
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी पाणी देखील पिलेलं नाहीये, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. आज सकाळी त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक आले होते, मात्र त्यांनी तपासणी करण्यासाठी नकार दिला आहे. आज सकाळपासून ते उठले देखील नाहीयेत.
