TRENDING:

बळीराजाच्या आनंदावर विरजण, 2 मोठ्या संकटांचं पोळ्यावर सावट!

Last Updated:

मराठवाड्यात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण यंदा या सणावर दुहेरी संकटाचं सावट दिसतंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना, 13 सप्टेंबर: कृषी संस्कृतीतील बळीराजाचा महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा होय. शेतात वर्षभर राब राब राबून बैलांच्या मेहनतीमुळे सोन्यासारखं पीक येतं. त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी देखील बैलपोळा सण अतिशय उत्साहाने साजरा करतो. बैलांना धुवून त्यांना सजवून पुरणपोळीचा नैवेद्य देखील खाऊ घातला जातो. मात्र यंदा हा सण दुहेरी संकटात असल्याचे दिसतेय. दुष्काळी परिस्थिती आणि त्यातच लम्पी रोगाने डोके वर काढले आहे. त्याचा परिणाम मराठवाड्यासह जालन्यातील बाजारात असून सर्वत्र शुकशुकाट आहे. शेतकऱ्यांनी दरवर्षीपेक्षा खरेदीसाठी हात आकडता घेतल्याचे चित्र आहे.
advertisement

पोळा सणावर दुहेरी संकट

पोळा सण 'बळीराजा'साठी सर्वांत महत्त्वाचा सण समजला जातो. अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक अन् लोकसंस्कृतीचा वारसा असलेला हा सण यंदा महागाई सोबतच लम्पीच्या प्रार्दुभाव आणि दुष्काळाच्या सावटाखाली दबला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महागाई वाढल्याने बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्यांचे दर 20 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. सिंधी बाजारात तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी भरलेल्या आठवडे बाजारात पोळ्यासाठी विविध साहित्याची दुकाने सजली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत दुकानदारांसह खरेदीदारांची गर्दी जेमतेम असल्याने व्यवसायिक देखील अडचणीत आले आहेत.

advertisement

इथं भरते चक्क बैलांची शाळा, कसं देतात शिक्षक ट्रेनिंग? पाहा VIDEO

लम्पी आजाराने धंद्याची वाट

मागील चार दिवसांपासून मी मामा चौकात दुकान लावलेलं आहे. लंपी रोगाने आमच्या धंद्याची वाट लागली आहे. यंदा पाऊस पण खूप कमी आहे. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात साहित्याची विक्री होत नाहीये. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे सध्या विक्री बरी आहे. मात्र तरी मागील वर्षीच्या तुलनेत शेतकरी फारच कमी खर्चात पोळ्याचे साहित्य खरेदी करता असल्याचं विक्रेते विशाल ठाकुर यांनी सांगितले.

advertisement

दुग्ध व्यवसायातून लाखोंची कमाई, आठवी पास तरुणानं कसं केलं नियोजन?

सगळेच शेतकरी चिंतेत

पाऊस कमी झाल्याने शेतकरी अडचणीत असतानाच पोळा सण आला आहे. त्यातच लम्पी रोग वाढत आहे. त्यामुळे यंदा जास्त काही उत्साह नाही आहे. दरवर्षी मी भरपूर साज बैलांना घ्यायचो. पण यंदा जरा कमी साहित्य घेतलं. पुढे पीक पाणी कसं राहिलं हे आताच सांगता येत नाही. त्यामुळे सगळेच शेतकरी चिंतेत असल्याचे वंजार उम्रदचे शेतकरी विष्णू सहारे यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
बळीराजाच्या आनंदावर विरजण, 2 मोठ्या संकटांचं पोळ्यावर सावट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल