TRENDING:

मराठवाड्यात पहिल्यांदाच, ऑलिंपिक दर्जाचा होतोय रनिंग ट्रॅक, लंडनहून येणार सिंथेटिक लिक्विड, Video

Last Updated:

मराठवाड्यातील पहिला आधुनिक सिंथेटिक ट्रॅक देखील तयार होत असून यासाठी लागणारे लिक्विड परदेशातून येणार आहे. पाहुयात काय आहेत या ट्रॅकची वैशिष्ट्ये…

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी इतर देशांच्या तुलनेत असमाधानकारक असल्याचे पहायला मिळते. याला देशात असलेल्या पायाभूत सुविधांचाही कमतरता कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. यामुळेच खेळांप्रती सकारात्मक वातावरण तयार व्हावे आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याचाच एक भाग म्हणून जालना जिल्हा क्रीडा संकुलावर सर्व खेळांसाठी अत्याधुनिक ऑलिंपिक स्तराची मैदाने तयार होत आहेत. मराठवाड्यातील पहिला आधुनिक सिंथेटिक ट्रॅक देखील तयार होत असून यासाठी लागणारे लिक्विड परदेशातून येणार आहे. पाहुयात काय आहेत या ट्रॅकची वैशिष्ट्ये…
advertisement

जालना शहरातील क्रीडा संकुल परिसरात 400 मीटर धावण्याचा अत्याधुनिक ट्रॅक तयार केला जात आहे. हा ट्रॅक अत्याधुनिक असेल. ट्रॅकसाठी 5 फूट खोल खोदकाम करून जीएसबी खडी आणि डांबरीकरणाचे दोन थर केले आहेत. या डांबराच्या थरावर कायम चिकटून राहण्यासाठी सिंथेटिक लिक्विड पृष्ठभाग असेल. ट्रॅक टिकण्यासाठी लंडनमधून पॉलिमरिक  पॉलियुरेथेनरबरयुक्त डांबर मागवावे लागत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांनी सांगितले.

advertisement

Monsoon Recipes: पावसाळ्यात बाहेर खायला जायची गरज नाही, घरीच बनवा स्वादिष्ट ब्रेड पॅटीस, रेसिपी एकदम सोपी, video

मराठवाड्यातील अत्याधुनिक

पहिला ट्रॅक जालन्यात होत आहे. या ट्रॅकचे आतापर्यंत बहुतेक काम झाले आहे. नुकतीच या कामाची पुणे क्रीडा संचालनालयाचे अॅथलेटिक खेळाचे प्रशिक्षक सुरेंद्र काकड, महेश पाटील, सुरेंद्र मोदी यांनी पाहणी करून काम कसे सुरू आहे, याचा अहवाल दिला आहे. याचे काम त्रुटीविरहित सुरू असल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे. याशिवाय, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा क्रीडाधिकारी संजय गाढवे हेही काम कसे होत आहे, याची देखरेख करत आहेत.

advertisement

इंग्लंडमधून मागविण्यात येणाऱ्या या पृष्ठभागावर जवळपास 4 कोटींचा खर्च होणार आहे. क्रीडा संकुलावर अशा प्रकारे धावण्यासाठी ट्रॅक आणि फुटबॉल मैदान होईल.

काय आहे सिंथेटिक लिक्विड?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

धावण्यासाठी ट्रॅकला प्रिफॅब्रिकेटेड रबर ट्रॅक कार्ड लावावे लागतात. रबराइज्ड डांबर, पॉलिमरिक पद्धत निवडल्यास त्यासाठी सिंथेटिक कार्ड लिक्विडला ट्रॅकला जोडावे लागतात. या कार्डमध्ये एअरबॅग्जही असतात. हे कार्ड इन्स्टॉलेशन मशीनने ट्रॅकशी जोडावे लागतातट्रॅकला लावण्यात आलेले कार्ड अनेक वर्षे टिकेल. ही रचना धावपट्टीला उत्कृष्ट लवचिकता, कणखरता, शॉक शोषण प्रभावासह खेळाडूच्या स्नायूंचा थकवा, दुखापती कमी करण्यासाठी महत्त्वाची असते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
मराठवाड्यात पहिल्यांदाच, ऑलिंपिक दर्जाचा होतोय रनिंग ट्रॅक, लंडनहून येणार सिंथेटिक लिक्विड, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल