जालन्यातील हा मार्ग बंद
जालना शहरात 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपासून नवदुर्गा माता देवी मूर्ती विसर्जनापर्यंत शहरात वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहे. गेडर टी पॉइंट ते अंबड चौफुली हा मार्ग बंद असून राजूर चौफुली मार्गे वाहने जातील. तर शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मंमादेवी मार्गावरूनही वाहतुकीला राजमहल टॉकीच्या मार्गावरून वळवले आहे.
advertisement
नवरात्रीत मोसंबीला मागणी, दरही तेजीत, जालना मार्केटमध्ये नेमकी काय आहे परिस्थिती?, VIDEO
वाहतूक मार्गात असा असेल बदल
जालन्यातील नियमित मार्ग छ. शिवाजी महाराज पुतळ्याकडून टांगा स्टॅण्ड, सराफा बाजार, पाणी वेस, सुभाष चौक मार्गे जुना जालन्यात जाणारी वाहतूक ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहल टॉकीज समोरील पुलावरून एमएसईबी कार्यालय, मंमादेवी मंदिरकडून रेल्वे स्टेशन व जुना जालन्यात जाईल.
जुना जालन्यातून नवीन जालन्यात येणारी वाहतूक ही याच मार्गाचा अवलंब करतील. सदर बाजार, रहेमान गंज, मुर्गी तलावाकडून मामा चौक, सुभाष चौक मार्गे जुना जालन्यात जाणारी वाहतूक ही जुना मोंढा कमान, दीपक वाईन शॉप, बसस्थानक, लक्कडकोट, शिश टेकडीमार्गे जाईल. तसेच जुना जालन्यातून नवीन जालन्यात येणारी वाहतूक सुद्धा याच मार्गाचा वापर करेल. हे आदेश 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपासून नवदुर्गा माता देवी मूर्ती विसर्जनापर्यंत लागू राहणार आहेत.
संभाजीनगरकडून येणारी वाहतूक वळवली
छत्रपती संभाजीनगरकडून जालनामार्गे अंबड तसेच मंठ्याकडे जाणारी वाहतूक ही जालना, गेडर टी पॉईंट, राजूर चौफुली, नवीन मोंढा, कन्हैयानगर बायपास रोडने नाव्हा चौफुली, मंठा चौफुली व अंबड चौफुली मार्गे जाईल. याच मार्गाने परतीचा प्रवास करेल. तर याच मार्गावर राजूरकडन येणारी तसेच जाणारी वाहनेही धावणार आहेत.






