भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना जे प्रत्युत्तर दिले त्याचं सर्वप्रथम आम्ही स्वागत करतो. आज पर्यंत जे झालं ते झालं परंतु आता हे नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. लोकांना ज्या पद्धतीने ठार केले जाते त्याचं कठोर प्रतिउत्तर देणारे हे सरकार आहे त्यामुळे मी सरकार आणि भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईचे स्वागत करतो, असं गणेश चौधरी यांनी सांगितलं.
advertisement
पाकिस्तानवर भारतीय सैन्याने रात्री दीड वाजेच्या सुमारास केलेल्या हल्ल्याची बातमी टीव्हीवर सकाळी पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला की तो शब्दात सांगता येणार नाही. सरकारने पंधरा दिवसानंतर का होईना पण झालेल्या प्रकाराचा बदला घेतला याचा आनंद असल्याचं अशोक नागरे यांनी सांगितलं.
भारताने हे जे प्रतिउत्तर दिल ते अभिनंदन करणे योग्य आहे. यापुढेही भारत सरकार आणि सेना जो काही निर्णय घेईल त्याला आपण भारतीय म्हणून समर्थन दिले पाहिजे. लवकरात लवकर भारताने पाकव्याप्त कश्मीर देखील ताब्यात घ्यावं. जेणेकरून भारतामध्ये तहशतवाद वाढणार नाही, असं भरत वायाळ यांनी सांगितलं.





