जालना : आपल्या दुचाकी किंवा चार चाकी वाहनावर असलेला क्रमांक हा आपल्या पसंतीचा असावा, असं प्रत्येकालाच वाटत असतं. जालना शहरातील नागरिकांसाठी पसंतीचा क्रमांक घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. नॉन ट्रान्सपोर्ट मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 21 सीसी ही सिरीज संपली आहे. यानंतर आता एमएच 21 सीडी 0001 पासून ते 9999 ही नवीन सिरीज सुरू होत आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांना आपल्या पसंतीचा क्रमांक घ्यायचा आहे त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क करावा, असा आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
Swapnil Kusale : फायनलसाठी गावातली मंडळी स्वप्नीलच्या घरी, निकाल लागताच एकच जल्लोष, VIDEO
जालना जिल्ह्यात नॉन ट्रान्सपोर्ट मोटारसायकल नोंदणीची मालिका एमएच 21 सीसी सद्यःस्थितीत सुरू असून या मालिकेतील क्रमांकांचे वाटप पूर्ण होत आले आहे. त्यामुळे नॉन ट्रान्सपोर्ट मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 21 सीडी 0001 ते 9999 ही मालिका 5 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे दुचाकीसाठी पसंतीचा क्रमांक हवा असेल तर त्यासाठी अर्ज सादर करावेत. तसेच सर्व संबंधितांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांच्या नावावर आपले धनाकर्ष बंद लिफाफ्यात 6 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करावेत.
Rain in Maharashtra : पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, पूर्व विदर्भात वाढणार पावसाचा जोर
या वेळेनंतर कोणत्याही सबबीवर धनाकर्ष जमा करुन घेण्यात येणार नाही. दुपारी 1 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येणार आहेत. या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील ज्या वाहनधारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा असेल त्यांनी आपल्या विहित नमुन्यातील अर्जासोबत राष्ट्रीयीकृत बँकेचा मूळ किमतीचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांच्या नावे असलेला धनाकर्ष, आधार कार्डच्या छायांकित स्वसाक्षांकित प्रतीसह, पॅनकार्ड व भ्रमणध्वनी क्रमांकासह 5 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यालयात अर्ज जमा करावा.