या सगळ्या घडामोडीनंतर जयंत पाटील यांना देखील याबाबत विचारण्यात आलं. पण जयंत पाटलांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर हात जोडून निघून गेले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर टीका करूनही जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर बोलणं टाळलं आहे. ते हात जोडून प्रसारमाध्यमांसमोरून निघून गेले आहेत.
विशेष म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. परंतु जयंत पाटील यांनी मात्र त्यावर प्रतिक्रिया टाळलं. जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात गेल्या काही दिवसापासून शाब्दिक चकमक सुरू आहे. गोपीचंद पडळकर त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत आहेत.
advertisement
पडळकरांच्या वक्तव्यावर खासदार विशाल पाटील यांची प्रतिक्रिया
यावेळी जयंत पाटलांसोबत असलेले सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. "सांगलीच्या संस्कृती, परंपरेला अशी वक्तव्ये शोभणारी नाहीत. जिल्ह्यात काही लोकांकडून जी वक्तव्य होत आहेत. त्याच्या मागे कोण आहे. बोलणाऱ्या व्यक्तीला फूस, मोकळीक कोणी दिली, हे पाहायला पाहिजे.
अजित पवार काय म्हणाले?
पडळकरांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार म्हणाले की, "गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं, याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण मी याच विचाराचा आहे कोणी कोणत्याही राजकीय विचाराचा असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे. एक संस्कृती आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करु नये. अशा प्रकारचे वक्तव्य हे वेदना देणारे असते."