‘ॲटलास मॉथ’ची ओळख
'ॲटलास मॉथ'चे दर्शन दुर्मिळ मानले जाते. या पतंगाचा मुख्य अधिवास दक्षिणपूर्व आणि दक्षिण आशियामध्ये आहे. हा पतंग ज्या प्रदेशात आढळतो, तो प्रदेश जैवविविधतेने समृद्ध असल्याचे मानले जाते. या पतंगाच्या दर्शनामुळे कास पठार आणि सह्याद्रीच्या पश्चिम घाटालगतचा प्रदेश जैवविविधतेने संपन्न असल्याचे सिद्ध होते.
वैशिष्ट्ये
- रंग आणि आकार : हा पतंग बदामी, तपकिरी आणि लालसर रंगाचा असतो. त्याची लांबी 11 ते 25 सेंटीमीटरपर्यंत असते.
- नकाशाप्रमाणे नक्षी : या पतंगाच्या पंखांवरील नक्षी एखाद्या नकाशाप्रमाणे दिसते, म्हणूनच त्याला 'ॲटलास मॉथ' असे म्हणतात.
- शरीर रचना : या पतंगाला तोंड आणि पचनसंस्था नसते. सुरुवातीच्या सुरवंट अवस्थेतच ते पुरेसे अन्न खातात.
- आयुष्य : त्यांचे आयुष्य फक्त 5 ते 7 दिवसांचे असते. प्रजनन काळ संपला की नर पतंगाचा मृत्यू होतो.
- प्रजनन : मादी एकावेळी 100 ते 200 अंडी घालते, त्यातून 10-14 दिवसांत सुरवंट बाहेर येतो. हा सुरवंट 35-40 दिवस झाडांची पाने खातो आणि 21 दिवसांनी कोषातून पतंग बाहेर येतो.
advertisement
दुर्मीळ दर्शन
निसर्गप्रेमी आणि अभ्यासक रवी चिखले यांना हा पतंग कास पठारावर आढळून आला. हा निशाचर पतंग असून तो रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतो. दालचिनी, पेरू आणि जांभूळ यांसारख्या झाडांवर तो आढळतो. यापूर्वी हा पतंग रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा येथेही आढळून आला आहे. नुकताच तो कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड येथे एका हाॅटेलमध्येही आढळून आला आहे.
हे ही वाचा : Mumbai : एक दिवसाची सुट्टी अन् प्लॅन करायचीय ट्रिप, मुंबईतील 'हे' हिडन प्लेसेस ठरतील बेस्ट; लगेच वाचा
हे ही वाचा : Kolhapuri Chappal : उद्योग ते ग्राहकापर्यंत 'कोल्हापूरी चप्पल'चा नेमका प्रवास; पण विक्रीची पद्धत ऐकून बसेल धक्का!