छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी मजूर कैलास रामभाऊ कुटेवाड असं केबीसी मध्ये 50 लाख रुपये जिंकलेल्या तरुणाचं नाव आहे. कैलास हे पैठण तालुक्यातील बालानगर जवळ असलेल्या एका 600 जणांच्या वस्तीत राहतात. त्यांना दोन एकर कोरडवाहू शेती असून त्यावर आई-वडील पती पत्नी दोन मुले यांचा उदरनिर्वाह चालतो. यावर नाहीच भागलं तर कैलास हे मोलमजुरी करतात.
advertisement
खरं तर कैलास कुटेवाड हे लहानपणी शाळेत हुशार असताना देखील योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही. त्याचं शिक्षण फक्त 12 वी पर्यंत झालं आहे. यामुळे त्यांच्या मनात याबाबत खंत होती. मात्र त्यांनी काहीतरी करण्याची इच्छा सोडली नाही.गेल्या पाच वर्षापासून ते केबीसी मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत अखेर सहाव्यांदा त्यांच्या प्रयत्नांना यश आला असून त्यांनी सहभागी होत 50 लाख रुपये जिंकले आहे.
केबीसीसाठी कशी तयारी केली?
मी 2011 साली अॅन्ड्रॉईड फोन घेतला आणि युट्यूब चालवायला सूरूवात केली.त्यानंतर माझ्या मनात कुतुहून निर्माण झालं आणि मग पाठपूरावा करत युट्यूबवरून त्यांची संपूर्ण माहिती घेत मी केबीसीत पोहोचलो.युट्यूबवरूनच मी सगळा अभ्यास केला आणि काही इतिहास भूगोलाची पुस्तके वाचली.मी दररोज शेती आणि मोलमजूरी करून कितीही थकलो असलो तरी अभ्यासाला एक तास दिला. दररोज जनरल नॉलेजचे व्हिडिओ बघितले आणि याचा मला चांगला फायदा झाला असे कैलास कुटेवाड सांगतात.
1 कोटीचा प्रश्न का सोडला?
जसं जसे प्रश्न आले तसे मला माझ्या ज्ञानाचा फायदा मिळाला आणि मी पुढे पुढे सरकत गेलो. जी उत्तर येत होती ती देण्याचा प्रयत्न केला आणि जिथे लाईफलाईनची गरज वाटली तिकडे लाईफलाईन घेतली. 1 कोटीच्या प्रश्नावर माघार घेतल्याची मला कुठलीही खंत नाही.कारण हा प्रश्न माझ्या कधीही वाचनात आला नव्हता. त्यामुळे तो मला खूपच कठीण गेला. या प्रश्नासाठी दोन लाईफलाईन शिल्लक होत्या त्या देखील वापरल्या तरी उत्तर मिळालं नाही.त्यामुळे खूप मोठा धोका होता.त्यामुळे तो धोका न पत्करता 50 लाख रूपये घेऊन मी बाहेर पडलो. याबाबत माझ्या मनात कुठलीही खंत नाही. मी समाधानी आहे,असे कैलास कुटेवाड सांगतात.
मी गेम सोडल्यानंतर माझ्या मनात जे उत्तर होतं तेच त्या प्रश्नाचं उत्तर होतं. पण तो माझा अंदाज होता त्याबाबत काही खात्री नव्हती. पण त्या स्टेजवर खात्री नसताना पुढे जाणे म्हणजे पायावर कु्ऱ्हाडी मारण्यासारखं आहे.त्यामुळे तो प्रकार करायचा नव्हता म्हणून मी गेम सोडला असे कैलास कुटेवाड सांगतात.