TRENDING:

कॉलर पकडली, वर्दी फाडली, मुंबईच्या कांदिवलीत गुंडांची पोलिसांना मारहाण, VIDEO व्हायरल

Last Updated:

मुंबईच्या कांदिवली परिसरात काही स्थानिक गुंडांनी थेट पोलीस पथकावर हल्ला चढवून त्यांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई: मुंबईच्या कांदिवली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काही स्थानिक गुंडांनी थेट हल्ला चढवून त्यांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
News18
News18
advertisement

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील एकता नगर परिसरात दोन गटांमध्ये मारामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या घटनेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालं होतं. मात्र, यावेळी स्थानिक गुंडांनी पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी उलट त्यांच्यावरच हल्ला चढवला.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात काही गुंड पोलिसांना रोखताना, त्यांच्याशी वाद घालताना आणि थेट त्यांच्यावर हात उचलताना स्पष्टपणे दिसून येत आहेत. यावेळी काही आरोपींनी थेट पोलिसांची कॉलर पकडून त्यांच्या वर्दीवर देखील हात टाकला आहे. पोलीस आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारातून स्थानिक गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही, हेच अधोरेखित होते. पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गुंडांची मजल जाणे हे मुंबईसारख्या महानगरासाठी चिंताजनक बाब आहे.

advertisement

घडलेल्या घटनेनंतर कांदिवली पोलीस तत्काळ अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी त्वरित मोठा बंदोबस्त तैनात केला. तसेच, अतिरिक्त पोलीस फौजफाटा बोलावून एकता नगर आणि आसपासच्या भागामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
24 तास धोक्याचे, कल्याण-डोंबिवलीत हाडं गोठवणारी थंडी, हवामान विभागाडून अलर्ट
सर्व पहा

दरम्यान, या हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींविरोधात पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी विभागातील सर्व संशयित गुंडांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली असून हल्ल्यात सहभागी असलेल्या मुख्य आरोपींविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कॉलर पकडली, वर्दी फाडली, मुंबईच्या कांदिवलीत गुंडांची पोलिसांना मारहाण, VIDEO व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल