TRENDING:

Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, कल्याण-डोंबिवलीत हाडं गोठवणारी थंडी, हवामान विभागाडून अलर्ट

Last Updated:
१५ डिसेंबरला तापमानात मोठी घट न होता, सध्याची थंडी कायम राहू राहण्याची शक्यता वर्तवली असून; आजचे ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली शहरातील हवामान अपडेट बघुयात.
advertisement
1/5
24 तास धोक्याचे, कल्याण-डोंबिवलीत हाडं गोठवणारी थंडी, हवामान विभागाडून अलर्ट
राज्यात थंडीची लाट सुरू असून,उत्तरेकडून येणारे थंड वारे कमी झाल्याने ठाणे जिल्ह्यांत तापमान १४°C आसपास राहू शकतो, त्यामुळे सकाळी आणि रात्री गारठा जाणवेल तर काही ठिकाणी किमान तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढेल. १५ डिसेंबरला तापमानात मोठी घट न होता, सध्याची थंडी कायम राहू राहण्याची शक्यता वर्तवली असून; आजचे ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली शहरातील हवामान अपडेट बघुयात.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यातील तापमानात घट झाल्याने थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. रविवारी असलेले तापमान आणि आजचे तापमान समांतर असून किमान तापमान १८ ते २०°C राहील आणि कमाल तापमान ३०°C पर्यंत राहू शकते, ज्यामुळे पुढील २ दिवस थंडी जाणवेल.
advertisement
3/5
डोंबिवली शहरात कालच्या तुलनेत आज सकाळच्या वेळी हवामानात हलके धुके आणि ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान २८ ते ३०°C आणि किमान तापमान १८ ते २०°C च्या दरम्यान असेल, त्यामुळे रात्री आणि पहाटे थंडी जाणवेल. नागरिकांना बाहेर पडताना उबदार कपडे घालावे, अशी माहिती हवामान विभागाने वर्तविले आहे.
advertisement
4/5
गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाली असून थंडीचा कडाका जाणवत आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण भागातील किमान तापमान १२°C ते १५°C तर कमाल तापमान २९°C ते ३०°C घसरण्याची शक्यता आहे. ज्यामुळे दिवसभर गुलाबी थंडीचा अनुभव येईल , सकाळी आकाश निरभ्र राहील आणि धुकेही पडू शकते.
advertisement
5/5
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे बदलापूरमध्ये नेहमीपेक्षा जास्त थंडी आज जाणवेल. किमान तापमान सुमारे १२°C आणि कमाल तापमान २४°C ते २८°C च्या दरम्यान असू शकते. थंडीची लाट असल्याने पारा घसरला आहे तर मुरबाड आणि शहापूरमध्ये कमाल तापमान २५°C ते ३३°C तर किमान तापमान 8°C ते 17°C पर्यंत खाली येऊ शकते. विशेषतः पहाटे मोठ्या प्रमाणात थंडी जाणवेल आणि दिवसा ऊन तर रात्री पुन्हा थंडीचा अनुभव येईल. त्यामुळे हवामान आल्हाददायक राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, कल्याण-डोंबिवलीत हाडं गोठवणारी थंडी, हवामान विभागाडून अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल