TRENDING:

दरवाजात बसण्यावरून वाद झाला, धावत्या ट्रेनमधून प्रवाशाला बाहेर फेकलं, कर्जत स्थानकात भयंकर घटना

Last Updated:

दरवाजात बसण्यावरून वाद झाल्याने एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला लाथ मारून ट्रेनबाहेर फेकल्याची घटना घडली आहे.या घटनेत पिडीत व्यक्ती जखमी झाला होता. पण आता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Karjat News : ट्रेनमध्ये वाद होणे हे काय नवीन नाही. दररोज असे दिवसभर असंख्य वाद होत असतात. काही वाद शुल्लक असतात. तर काही वाद जीवावर देखील बेतात,पण अशा घटना क्वचितच घडतात.अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत दरवाजात बसण्यावरून वाद झाल्याने एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला लाथ मारून ट्रेनबाहेर फेकल्याची घटना घडली आहे.या घटनेत पिडीत व्यक्ती गंभीर झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण आता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. विनोद कांबळे असे या मृत प्रवाशाचे नाव आहे. कर्जत भिवपुरी स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
karjat news
karjat news
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विनोद कांबळे हे त्यांच्या मित्रासह मुबई दर्शनासाठी जात होते. पुण्यावरून ते कोणार्क भुवनेश्वर एक्सप्रेसमधून ते मुंबईच्या दिशेने येत होते. त्याचवेळी मंगेश दसोरे हे त्याच एक्सप्रेसने अकोला पुणे मुंबई असा प्रवास करत होता. या प्रवासा दरम्यान एक्सप्रेसच्या दरवाजात बसण्यावरून विनोद कांबळे आणि मंगेश दसोरे यांच्यात जोरदार वाद झाला. सुरूवातीला दोघामध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढल्यानंतर दोघेही हाणामावर आले. या दरम्यानच मंगेश दसोरे यांनी विनोद कांबळे यांना जोराची लाथ मारली होती.त्यामुळे धावत्या ट्रेनमधून विनोद कांबळे ट्रॅकवर पडले होते.या घटनेनंतर तत्काल चैन खेचून रेल्वे रोखण्यात आली होती.

advertisement

ही घटना मंगळवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास मध्य रेल्वेच्या कर्जत भिवपुरी स्थानकादरम्यान घडली होती. या घटनेत विनोद कांबळे हे गंभीररित्या जखमी झाले होते.त्यामुळे विनोदला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचाराखातर दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान विनोदचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कर्जत रेल्वे पोलिसांनी आरोपी मंगेश दसोरे याला आज सायंकाळी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान या घटनेने प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. तसेच प्रवाशांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दरवाजात बसण्यावरून वाद झाला, धावत्या ट्रेनमधून प्रवाशाला बाहेर फेकलं, कर्जत स्थानकात भयंकर घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल