TRENDING:

मोठी बातमी : सिंदखेडमधील वंचितच्या उमेदावारचे अपहरण, अजित दादाच्या पक्षावर गंभीर आरोप; वातावरण तापलं

Last Updated:

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शेख जिलानी यांच्यावर जबरदस्तीने दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल खंडारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

बुलढाणा :  बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान एक गंभीर आणि चिंताजनक प्रकार समोर आला असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शेख जिलानी यांच्यावर जबरदस्तीने दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप पक्षाच्या नेत्या सविता मुंडे यांनी केला आहे.

advertisement

मंगळवारी सविता मुंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, शेख जिलानी यांना धमकावून आणि मानसिक दबाव आणून अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे, त्याच दिवसापासून शेख जिलानी हे बेपत्ता असून त्यांचा कोणताही संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. या प्रकरणामागे अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमच्या उमेदवारांचे अपहरण करण्यात आले असून हा प्रकार लोकशाहीवर घाला असल्याचे मुंडे यांनी ठामपणे नमूद केले.

advertisement

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संबंधित पोलीस ठाण्यात तातडीने अपहरणाची तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेख जिलानी यांचा तात्काळ शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

राष्ट्रवादीने आरोप फेटाळले

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी सर्व आरोप साफ फेटाळून लावले आहेत. या घटनेशी आपला किंवा पक्षाचा कोणताही संबंध नसून, हे राजकीय हेतूने करण्यात आलेले आरोप असल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्याही प्रकारच्या दबाव अथवा अपहरणात आपली भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

जिल्ह्यात वातावरण चिघळले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शरिरासाठी पौष्टिक, हिवाळ्यात बनवा अंबाडीच्या फुलांची चटणी, चव अतिशय टेस्टी
सर्व पहा

या संपूर्ण प्रकरणामुळे सिंदखेडराजा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वातावरण चिघळले असून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनानेही दखल घेत सखोल चौकशी सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. शेख जिलानी यांचा शोध लागेपर्यंत या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी : सिंदखेडमधील वंचितच्या उमेदावारचे अपहरण, अजित दादाच्या पक्षावर गंभीर आरोप; वातावरण तापलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल