अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगदी तोंडावर पी एन पाटील यांचे राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पाटील कुटुंबियांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला फायदा होईल, असे अजित पवार म्हणाले.
राहुल पाटलांना आमदार करा, अजित पवार म्हणाले, जे तुझ्या मनात तेच माझ्या मनात
advertisement
अजित पवार म्हणाले, पी एन पाटील साहेब आपल्या सगळ्यांना अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की राहुल भैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून चूक केली असे कपादि वाटू देणार नाही. राज्याच्या विकासासाठी शेतकरी, तरुण-तरुणी मागे राहू नये यासाठी आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार न सोडता सत्तेत सहभागी झालो आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सर्वात आधी बेरजेचे राजकारण सुरू केले. सर्वधर्मसमभाव विचार घेऊन चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आश्वासक चेहरा म्हणून तुम्ही राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याकडे पाहता. तुमच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खूप मोठा फायदा होणार आहे. काळजी करू नका, तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे ते येणाऱ्या काळात पूर्ण करू, असे सूचकपणे अजित पवार म्हणाले.
होय रे बाबा... आता स्टॅम्पवर लिहून देऊ का?
आपण सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाला आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पक्षाला बाधा पोहचेल असे वागता कामा नये. गेल्या वेळी जरा कमी पडला, नाहीतर ते आमदार झालेच असते, असे अजित पवार म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांमधून राहुलदादा पाटील यांना आमदार करा, अशी आरोळी एकाने ठोकली. त्यावर, होय रे बाबा... आता स्टॅम्पवर लिहून देऊ का? तू माझी लिंक तोडू नको, माझी लिंक तुटली तर तुझं काय खरं नाही, असे अजितदादा मिश्किलपणे म्हणाले.
जिल्हा परिषद झाली, आता विधिमंडळ बाकी आहे
जिल्हा परिषद झाली, आता विधिमंडळ बाकी आहे. हे कार्यकर्ते आमची ताकद असते, कार्यकर्ते नसतील ही जनता नसेल तर आम्हाला कोण कुत्रं विचारणार नाही. मी कुठेही मागे पडणार नाही, तुम्ही देखील जीवात जीव असेपर्यंत राहुल पाटील यांना साथ द्या. कोणतरी कान भरतील, कोण तरी काड्या घालण्याचे काम करतील पण कुणाचं काही ऐकू नका, असेही अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
