सुरेश उर्फ रमेश तिमाणा बंडीवड्डर (वय-32, रा. गांधीनगर, तिसरा क्रॉस) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी यल्लप्पा शांताराम बंडीवड्डर (वय-60), यशवंत उर्फ अनिल यल्लप्पा बंडीवड्डर (वय-25) आणि सावित्री यल्लप्पा बंडीवड्डर (वय- 55) यांच्यासह तिघांवर खानापूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत सुरेशची पत्नी स्नेहा हिचे आधीच विवाहित असलेल्या यशवंतसोबत अनैतिक संबंध होते. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी हे दोघेही पळून गेले होते. आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार सुरेशने शनिवारी (दि. 2 ऑगस्ट) पोलिसांत दिली होती. मात्र, रविवारी सकाळी पळून गेलेले दोघेही घरी परतले. या दोघांना समज देऊन या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी पंचांच्या उपस्थितीत दुपारी मारुती मंदिरात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही पंच उपस्थित होते.
advertisement
रागाच्या भरात घेतला जीव!
बैठक सुरू असताना, सुरेशने आपल्या पत्नीला फूस लावून पळवून नेल्याच्या रागातून यशवंतला जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये जोरदार वाद होऊन अचानक हाणामारी सुरू झाली. या गोंधळात यशवंतचे वडील यल्लप्पाने अचानक सुरेशच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की, सुरेशच्या पोटातून आतडी बाहेर आली आणि तो जागीच कोसळला. या घटनेमुळे गांधीनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खानापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा : संभाजीनगरमध्ये मध्यरात्री भयंकर कांड, पती घरात झोपला होता, पत्नीने तोंडावर ठेवली उशी, प्रियकराने गळा आवळला
हे ही वाचा : राक्षसी कट! मुख्याध्यापकाची होत नव्हती बदली म्हणून 11 विद्यार्थ्यांना पाजलं विष; वाचा सविस्तर...