TRENDING:

गणेशोत्सवात चांद्रयानची क्रेझ, मंडळानं पावतीवरच दिली खणखणीत सलामी!

Last Updated:

कोल्हापुरातील गणेशोत्सवात यंदा चांद्रयानची क्रेझ दिसतेय. वर्गणी पावतीवरच दिलीय अनोखी सलामी.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर, 6 सप्टेंबर : गणेशोत्सव काळात कोल्हापुरातील बऱ्याचशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून वर्गणीपासून देखाव्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे विधायक उपक्रम राबवले जातात. त्यातच चांद्रयान 3 ची क्रेझ अजून कमी झालेली नाही. त्यामुळे कोल्हापुरातील एका मंडळाने असाच एक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या गणेशोत्सवाच्या वर्गणी पावतीवरच चांद्रयान 3 च्या मोहिमेबाबत छापले आहे.
advertisement

खरंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान यशस्वीरित्या उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. जगभरात या चांद्रयान 3 या मोहिमेचे कौतुक झाले आणि आजही त्याबाबत चर्चा रंगताना पाहायला मिळतात. त्यामुळेच कोल्हापूरच्या शिवाजी पेठेत असणाऱ्या मरगाई गल्ली गणेशोत्सव मंडळाच्यावतीने चांद्रयान 3 मोहिमेची थोडक्यात माहिती आपल्या वर्गणी पावतीवर छापली. इतकेच नाही तर घरोघरी वर्गणीसाठी गेल्यावर या मोहिमेबद्दल मंडळाच्या सदस्यांकडून सांगण्यात येणार आहे.

advertisement

'लालबागच्या राजा'चं कोल्हापूर कनेक्शन, 1980 पासून आहे खास परंपरा

मोहीम यशस्वी झाल्यावर लगेच लागले कामाला

चांद्रयान 3 मोहिमेत चंद्रावर यान उतरल्यानंतर मंडळाच्या सर्वच सदस्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला होता. त्याचबरोबर यंदाच्या गणेशोत्सवातील एक वेगळा उपक्रम म्हणून सगळ्यांच्या संकल्पनेतून ही कल्पना पुढे आली. विज्ञानाकडे जायच्या उद्देशाने ही संकल्पना अंमलात आणण्यात आली आहे. 1901 साली स्थापन झाकेल्या या मंडळाने आजवर अनेक रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, वृक्षारोपण असे उपक्रम राबविले आहेत. मंडळाकडून गणेशोत्सव काळात डॉल्बीला फाटा देऊन पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळेच यंदा मुलांनी हा उपक्रम हाती घेतला आहे, असे मंडळाच्या एका सदस्याने सांगितले.

advertisement

काय छापले आहे वर्गणी पावतीवर?

मंडळाची वर्गणी पावती ही चांद्रयान तीन मोहिमेची माहिती पत्रिका आणि वर्गणी पावती अशा पद्धतीची आहे. एका बाजूला मोहिम यशस्वी झाल्याची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह मानल्या जाणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांचा आणि मिसाइल मॅन तथा भारताचे माजी राष्ट्रपति डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे फोटो लावण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ही मोहीम यशस्वी करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या वैज्ञानिकांचा गौरव करण्यात आला आहे.

advertisement

कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा गाभारा होणार सुरु, पाहा कधीपासून मिळणार दर्शन

चांद्रयान 3 ची प्रतिकृती

आपल्या वर्गणी पावतीवर माहिती छापून मरगाई गल्ली मंडळाकडून हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर मंडळाच्या सदस्यांकडून सजावटीसाठी चांद्रयान 3 ची छोटी प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात एकापेक्षा एक सामाजिक उपक्रम कोल्हापुरातील अनेक मंडळे राबवत असतात. त्यातच या अनोख्या आणि अभिमानास्पद अशा उपक्रमामुळे या मंडळाची चर्चा सर्वत्र होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
गणेशोत्सवात चांद्रयानची क्रेझ, मंडळानं पावतीवरच दिली खणखणीत सलामी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल