पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव येथील विश्वनाथ बाबूराव कोरी यांचा मुलगा प्रशांत याने 'आयटीआय'ची पदविका पूर्ण केली होती. पदवी मिळाल्यानंतर त्याने काही काळ पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर तो अलीकडेच संकेश्वर येथील एका साखर कारखान्यात कामाला लागला होता. त्याचे आयुष्य नुकतेच मार्गावर येत होते.
हे ही वाचा : Kolhapur News: मेलेली संजना जिवंत परतली! मग अंत्यसंस्कार कोणावर झाले? पोलिसांसमोर मोठा पेच!
advertisement
दरम्यान, मंगळवारी (दि. 29) प्रशांतने घरातील पाण्याच्या बाटलीत ठेवलेले किडीवर मारण्याचे औषध (तणनाशक) पाणी समजून प्राशन केले. ही गंभीर चूक त्याच्या जीवावर बेतली. तणनाशक पोटात गेल्याने त्याची प्रकृती अत्यंत खालावली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान प्रशांतची प्राणज्योत मालवली.
प्रशांतच्या पश्चात त्याचे आई, वडील, आजोबा आणि भाऊ असा परिवार आहे. तरुण मुलाच्या अशा अचानक आणि दुर्दैवी निधनाने कोरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडील विश्वनाथ कोरी यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. एका क्षणाच्या चुकीने एका उमद्या तरुणाचा जीव गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा : Nagpur News: 'लुटेरी दुल्हन' समीराने 8 जणांना घातला 2 कोटींचा गंडा; मोडस ऑपरेंडी पाहून व्हाल चकित!