TRENDING:

हुपरी ते टेक्सास! गावच्या पोराचं मोठं काम; सुईशिवाय लसीकरण जगातील पहिलं संशोधन

Last Updated:

कोल्हापूरचे युवा संशोधक डॉ. रोहन इंग्रोळे यांनी सुईमुक्त लसीकरणाचे अभूतपूर्व संशोधन करून जगाला अचंबित केले आहे. अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात त्यांनी दात आणि हिरड्यांमधील...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : इंजेक्शनची सुई... ही कल्पनाच अनेकांना धडकी भरवते. सुईच्या भीतीने अनेक जण डॉक्टरांकडे जाणेही टाळतात आणि आरोग्याच्या समस्यांवर गोळ्या-औषधांनी उपचार घेणे पसंत करतात. पण आता यावर कोल्हापूरच्या एका तरुणाने क्रांतीकारी उपाय शोधला आहे! यापुढे लसीकरणासाठी इंजेक्शनची गरजच भासणार नाही, हे संशोधन डॉ. रोहन इंग्रोळे या युवा संशोधकाने केले आहे.
Rohan Ingrole
Rohan Ingrole
advertisement

डॉ. रोहन इंग्रोळे यांनी अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात दात आणि हिरड्यांमधील रोगप्रतिकारक शक्तीचा उपयोग करून डेंटल फ्लॉसच्या मदतीने उंदरांवर केलेल्या लसीकरणाचे संशोधन यशस्वी करून दाखवले आहे. "मर्यादित संसाधने आणि कमीत कमी प्रशिक्षणासह हे संशोधन मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते," असा दावा डॉ. इंग्रोळे यांनी केला आहे.

संशोधनामुळे अनेक अडचणींवर मात

advertisement

डॉ. रोहन इंग्रोळे यांनी विकसित केलेली ही लसीकरणाची सुईमुक्त पद्धत खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकते. त्यांनी दातांच्या फ्लॉसचा वापर करून लसीकरणाचे संशोधन केले आहे. या संशोधनात निर्जंतुक केलेल्या विषाणूजन्य लेप दिलेल्या दाताच्या फ्लॉसने उंदराचे दात स्वच्छ करून लसीकरण यशस्वी करण्यात आले. ही पद्धत लसीकरणाच्या प्रक्रियेत मोठी क्रांती घडवून आणणार आहे. यामुळे सुईने होणारा त्रास, भीती आणि लसीकरणासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता अशा अनेक अडचणींवर मात करण्यास मदत होईल.

advertisement

जगातील पहिलेच अनोखे संशोधन!

जागतिक पातळीवर अशा प्रकारचे हे पहिलेच संशोधन आहे. हुपरीसारख्या गावातील या तरुणाने थेट अमेरिकेत आपले नाव कोरले आहे. सध्या अनेक लसी वेगवेगळ्या प्रकारच्या इंजेक्शन्सद्वारे दिल्या जातात. यामध्ये सुईची भीती, रुग्णांना होणारा त्रास आणि लसीकरणासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज यांसारख्या मर्यादा येतात. इंजेक्शनच्या भीतीमुळे अनेक रुग्ण लसीकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत असलेल्या डॉ. रोहन इंग्रोळे यांनी चक्क सुईमुक्त लसीकरण शक्य असल्याचे संशोधन करून जगाला अचंबित केले आहे!

advertisement

उंदरांवर यशस्वी प्रयोग

डॉ. रोहन इंग्रोळे हे गेल्या 10 वर्षांपासून अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेऊन संशोधन करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेत, तर पदवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरातील केआयटी महाविद्यालयात पूर्ण केले. गेल्या 10 वर्षांपासून टेक्सास युनिव्हर्सिटीतील वेगवेगळ्या संशोधनात सहभागी असताना, डॉ. रोहन इंग्रोळे यांना लसीकरणासाठी सुईचा वापर न करता अनोख्या पद्धतीने लसीकरण करता येईल का, याबद्दल संशोधनास सुरुवात केली.

advertisement

सुईमुक्त लसीकरण करताना तोंडाद्वारे ड्रॉप्स किंवा नाकावाटे स्प्रे देण्याचा पर्याय असतो. परंतु, यामध्ये इंजेक्शनच्या साठवणुकीची आणि वितरणाची व्यवस्था आव्हानात्मक असल्याचे दिसून आले. यावर उपाय म्हणून डॉ. रोहन इंग्रोळे यांनी हिरड्या आणि दातांच्या रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करण्याच्या क्षमतेचा विचार करून डेंटल फ्लॉसने लसीकरणाचे संशोधन केले. आणि त्यांचा हा प्रयोग उंदरांवर यशस्वी झाला आहे.

हे ही वाचा : Kolhapur News: पंचगंगेची पातळी घटली, 30 बंधारे अजूनही पाण्याखाली; 4 लाखांचे नुकसान

हे ही वाचा : Marathwada Rain: मराठवाड्यात पुन्हा मुसळधार, 24 तासात बदलणार हवा, हवामान विभागाचा अलर्ट नवा!

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
हुपरी ते टेक्सास! गावच्या पोराचं मोठं काम; सुईशिवाय लसीकरण जगातील पहिलं संशोधन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल