कुटूंबियांनीच महिलेला बांधून ठेवलं
पोलीस आल्यानंतर महिलेची अवस्था वाईट होती. तिला नीट उठायला देखील येत नव्हतं. महिलेच्या कुटूंबियांनीच महिलेला बांधून ठेवलं होतं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय. माणूस आणि प्राण्यांमध्ये फरक असतो, असं म्हणत अनेकांनी टीका केली आहे.
....म्हणून मला इथं बांधून ठेवलं - पिडित महिला
advertisement
दरम्यान, मला घरातून बाहेर जाण्यास मनाई केली जात होती, म्हणून मला इथं बांधून ठेवलं गेलं होतं, असं साखळदंडाने बांधून ठेवलेल्या महिलेने म्हटलं आहे. त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. महिलेला तपासणीसाठी घेऊन जाणार आहोत. तर त्यानंतर संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
पुरोगामी कोल्हापुरात चाललंय काय?
महाराष्ट्र, जो एकेकाळी पुरोगामी विचारांचा आणि सामाजिक सुधारणांचा ध्वजवाहक म्हणून ओळखला जात होता, तोच आज महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत मोठ्या आव्हानांना सामोरा जात आहे. गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या घटना, विशेषतः हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, सायबर गुन्हे आणि रस्त्यावरची वाढती गुन्हेगारी, यांनी राज्यातील महिला सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या घटना केवळ आकडेवारी नाहीत, तर त्या महिलांच्या मनात निर्माण झालेली भीती आणि असुरक्षिततेची भावना दर्शवतात.