कोल्हापूर : कोणत्याही वाद्याची वापरता येणारी छोटी प्रतिकृती तयार करणे, तसे अवघडच असते. मात्र कोल्हापूरच्या एका संगीतप्रेमीने असेच एक छोटे वाद्य बनवले आहे. अगदी मोठ्या तानपुऱ्याप्रमाणेच दिसणारा आणि वाजवता येणारा जगातला सर्वात छोटा तानपुरा कोल्हापुरातील या व्यक्तीने बनवला आहे. आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून काम करणारी ही व्यक्ती संगीत क्षेत्रातील आपली आवड ही अशा विविध पद्धतीने जपत आली आहे.
advertisement
कोल्हापूरच्या अनिलकुमार वैद्य या आयुर्वेद तज्ञांनी सुरुवातीपासूनच संगीत क्षेत्रातील आपली आवड जपली आहे. गेल्या काही वर्षांपासून याबाबतचे शिक्षणही घ्यायला सुरुवात केली होती. पंडित शामराव सुतार यांच्याकडे त्यांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण सुरू आहे. संगीत क्षेत्रातील आवडीमुळे दुर्मिळ अशी अनेक वाद्य माझ्याकडे आहेत. त्यातच मोठा तानपुरा हा लहान मुलांना सहसा वाजवता येत नाही. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी घेऊन जाताना तानपुऱ्याचा भोपळाही फुटू शकतो. त्यामुळेच एखादा असा छोटा तानपुरा बनवण्याची कल्पना डोक्यात आल्याचे अनिल कुमार वैद्य सांगतात.
राज्यातील तृतीय पंथियांचा पहिलाच Fashion Show, कोल्हापुरात दिसला अनोखा माहोल, Video
कसा बनवला इतका छोटा तानपुरा?
वैद्य यांनी बनवलेला तानपुरा हा जगभरातील सर्वात छोटा वाजणारा तानपुरा आहे. अशा पद्धतीचा तानपुरा कोणीही अजून बनवलेला नाही आहे. विशेष म्हणजे या तानपुऱ्याला संगीत शास्त्रामध्ये असणारे नादाचे नियम लागू होतात. एका सहकाऱ्याच्या मदतीने हा तानपुरा सुरुवातीला डिझाईन करून मिरजेतील अल्ताफ सतारमेकर यांच्याकडून निर्माण करवून घेतला. यासाठी साधारण 15 हजार रुपयांचा खर्च आला असल्याची माहिती अनिलकुमार वैद्य यांनी दिली आहे.
आता कुंडीत वाढवा डेरेदार वृक्ष, बोन्साय बद्दल माहितीये का? जाणून घ्या सविस्तर Video
कसा आहे हा तानपुरा ?
मोठ्या तानपुराप्रमाणेच दिसणारा हा छोटा तानपुरा म्हणजे अगदी उपयोगी वाद्य आहे. याचे वजन फक्त एक किलो असून उंची देखील अगदी कमी आहे. त्यामुळेच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हा सहज वापरू शकतो. कोणत्याही सप्तकाप्रमाणे याला सेट करता येत असून याला पिकअप देखील जोडून घेतले आहे. त्यामुळे याचा आवाज अजून वाढतो. मोठ्या तानपुराप्रमाणेच याच्यासाठी एक छोटा भोपळा वापरण्यात आला आहे. या तानपुऱ्याच्या तारा देखील वेगळ्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वापरलेल्या आहेत. मात्र या तारा देखील मोठ्या तानपुऱ्या सारखाच आवाज देतात, असेही वैद्य यांनी सांगितले.
दरम्यान, जगातील हा पहिलाच अगदी छोटा पण वाजणारा तानपुरा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी सोयीचा आहे. यामुळे लहान मुलांना तानपुरा वाद्य शिकण्यासाठी सर्वात जास्त फायदा होऊ शकतो, असा विश्वास देखील अनिल कुमार वैद्य यांनी व्यक्त केलाय.