नवरात्रौत्सवाच्या काळात कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर सरस्वती टॉकीजजवळील बहुमजली पार्किंग नवरात्रौत्सवापूर्वी सुरू करण्यात येणार आहे. पार्किंगचे काम जवळपास पूर्ण झाले असून सी.सी.टी.व्ही.चे काम बाकी आहे. तेही त्वरित पूर्ण करून पार्किंग सुरू करण्यात येईल, असे के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
Ambabai Mandir: अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार, जाणून घ्या कधी आणि का?
advertisement
कसे असेल बहुमजली पार्किंग?
बहुमजली पार्किंगमध्ये 224 दुचाकी तर 75 हून अधिक चारचाकी पार्क करण्याची क्षमता आहे. त्यामुळे नवरात्रौत्सवापूर्वीच बहुमजली पार्किंग सुरू करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. गाडीअड्डाजवळील अतिक्रमणे काढून तेथे देखील पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहेत.
दरम्यान, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ मानल्या जाणाऱ्या अंबाबाई मंदिरात नवरात्री उत्सव काळात राज्यभरातून भाविक येत असतात. याठिकाणी मोठा उत्सव असतो. त्या पार्श्वभूमीवर मंदिराची स्वच्छता आणि इतर तयारी केली जात आहे.