‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ला प्रतिसाद कमी
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या मार्गावर पहाटे 5 वाजल्यापासून ई-शिवाई बससेवा सुरू आहे. प्रवाशांचे म्हणणे आहे की, ‘शिवशाही’ बसेस अनेकदा रस्त्यात बंद पडतात किंवा त्यांना आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच, शिवशाही बसमधील स्वच्छता आणि आसन व्यवस्था फारशी चांगली नाही. त्यामुळे प्रवाशांनी आता ‘ई-शिवाई’ला अधिक पसंती दिली आहे.
advertisement
तिकिटाचे दर कमी करण्याची मागणी
‘ई-शिवाई’ बससेवा चांगली असली, तरी गेल्या काही महिन्यांत तिकिटाच्या दरात मोठी वाढ झाल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. आधी 500 रुपये असलेले तिकीट आता 623 रुपयांवर गेले आहे. त्यामुळे तिकिटाचे दर कमी करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. कोल्हापूर आगार व्यवस्थापकांनी सांगितले की, “प्रवाशांची मागणी आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवली आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून, लवकरच आणखी बसेस ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे.”
हे ही वाचा : ST Service: दोन दिवसांत अष्टविनायक दर्शन! महिला आणि ज्येष्ठांना मिळतेय विशेष सवलत
हे ही वाचा : Pune Police: पोलिसांना मिळाली नवीन 'दृष्टी', नागरिकांच्या सुरक्षेची गुणवत्ता वाढणार