TRENDING:

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात मिळतात पर्यटकांना आवडणारे आप्पे, राधाबाईंनी रेसिपीही सांगितली VIDEO

Last Updated:

राधाबाई कृष्णात कोटकर या कोल्हापुरातील शिवाजी पेठेत खंडोबा तालीम परिसरात राहतात. त्यादेखील अंबाबाई मंदिराच्या महाद्वाराजवळ ताराबाई रोडवर आप्पे, इडली, आंबोळी आदी पदार्थांचा स्टॉल लावतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : कोल्हापूरला भेट देणारे पर्यटक आणि अंबाबाई मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी अंबाबाई मंदिर परिसरात अनेक महिलांनी फूड स्टॉल लावलेले पाहायला मिळतात. आपल्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीने इडली, डोसा, आप्पे अशा नाश्त्याच्या पदार्थांचे हे फुड स्टॉल फक्त सकाळीच या ठिकाणी पाहायला मिळतात. याच स्टॉलवर मिळणाऱ्या आप्पे या दक्षिणात्य पदार्थाचे पाककृती काय आहे, याचबाबत गेली कित्येक वर्षे आप्पेचा स्टॉल लावणाऱ्या राधाबाई कोटकर यांनी माहिती दिली आहे.

advertisement

राधाबाई कृष्णात कोटकर या कोल्हापुरातील शिवाजी पेठेत खंडोबा तालीम परिसरात राहतात. त्यादेखील अंबाबाई मंदिराच्या महाद्वाराजवळ ताराबाई रोडवर आप्पे, इडली, आंबोळी आदी पदार्थांचा स्टॉल लावतात. गेली 12 वर्षे ते हे काम करत असल्यामुळे त्यांचा चांगला जम या ठिकाणी बसला आहे. रोज सकाळी 10 वाजेपर्यंत हा त्यांचा नाश्त्याचा स्टॉल असतो, असे राधाबाई यांनी सांगितले.

advertisement

पारधी वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी वर्ध्यातील तरुणाचा कौतुकास्पद निर्णय, नेमकं काय केलं?

कसे बनवले जातात आप्पे?

कोणताही दाक्षिणात्य पदार्थ बनवण्यापूर्वी त्याचे पीठ आधी भिजवून थोडे आंबवून घ्यावे लागते. त्यानुसारच राधाबाई रोज सगळी तयारी करत असतात.

1) सकाळी तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळे भिजत घातले जातात.

2) दिवसभर हे तांदूळ आणि डाळ भिजल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी साधारण 4 ते 5 वाजता मिक्सरमध्ये थोड जाडसर बारीक करून घेतले जाते.

advertisement

3) इडली आणि डोशासाठी थोडे रवरवीत आणि जाडसर पीठ करावे लागते. तर आप्पे बनवण्यासाठी जरा जास्त बारीक पीठ करावे लागते.

4) एकत्र केलेले मिश्रण एका स्टीलच्या डब्यात रात्रभर आंबण्यासाठी ठेवून दिले जाते.

5) सकाळी या पिठाचे दाक्षिणात्य पदार्थ करता येतात. पीठ किती फुलले आहे हे पाहून त्यामध्ये थोडा खायचा सोडा आणि मीठ टाकले जाते.

advertisement

6) आप्पे बनवण्यासाठी आप्पेच्या बीडाच्या तव्यातील साच्यात थोडे तेल टाकून एक एक चमचा पीठ प्रत्येक साच्यात टाकावे.

7) एक मिनिट झाकून ठेवून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे.

8) तयार आप्पे आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

केमिस्ट्रीमध्ये 100 पैकी 100 मार्क्स, कोणत्याही कोचिंगविना गरीब शेतकऱ्याची पोरगी राज्यात पहिली, सांगितलं यशाचं हे रहस्य

दरम्यान, राधाबाई यांच्याकडे मिळणाऱ्या आहे पदार्थांमध्ये आप्पे आणि इडली 30 रुपयांना, साधा डोसा, मसाला डोसा आणि थालीपीठ 40 रुपयांना मिळतात. तर रोज सकाळी 7 ते 10 सुरू असणाऱ्या या नाष्टाच्या स्टॉलवर अनेक भाविक आणि पर्यटकांची गर्दी होत असते.

पत्ता : अंबाबाई मंदिर महाद्वार चौक, ताराबाई रोड, कोल्हापूर

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात मिळतात पर्यटकांना आवडणारे आप्पे, राधाबाईंनी रेसिपीही सांगितली VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल