पाणीपुरवठा बंद राहणारे भाग
या दुरुस्तीमुळे ए आणि बी वॉर्डातील पुईखडी, कलिकते नगर, सुलोचना पार्क, इंगवले कॉलनी, नाना पाटील नगर, जिवबा नाना, बापूरामनगर, साळोखेनगर, राजीव गांधी वसाहत, कात्याणी कॉम्प्लेक्स, तपोवन, देवकर पाणंद, मोरे माने नगर, संभाजीनगर स्टँड, नाळे कॉलनी, रामानंद नगर, बालाजी पार्क, शाहू कॉलनी, सासणे कॉलनी, रायगड कॉलनी, जरगनगर, सुभाषनगर, शेंडापार्क, आर.के.नगर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी, गंजीमाळ, शिवाजी पेठ, राजकपूर पुतळा परिसर, मंगळवार पेठ, पोतणीस बोळ, मंगेशकर नगर, बेलबाग, महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, त्रिकोणे गॅरेज, नेहरूनगर, वाय.पी.पोवार नगर, जवाहर नगर आणि सलग्न ग्रामीण भागात पाणीपुरवठा खंडित होईल.
advertisement
Honey: मधमाशी करणार नाही दंश, मध काढतानी टाळा या चुका, मधुसखींनी दिली महत्त्वाची माहिती
त्याचप्रमाणे, ई वॉर्डमधील संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल, शाहूमिल कॉलनी, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यू कॉलनी, अरुणोदय, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कूल, सम्राट नगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारुती चौक, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदिर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डिफेन्स, राजाराम रायफल, काटकरमाळ यासह कावळानाका आणि बावडा फिल्टर हाऊसवर अवलंबून असलेल्या कसबा बावडा, लाईन बाजार, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, महाडीक वसाहत, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल परिसर, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, शिवाजीपार्क, फ्रेंड्स कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळापार्क, रमणमळा, शालिनी पॅलेस, मुक्त सैनिक वसाहत, मार्केट यार्ड, सी.बी.एस. स्टेशन रोड, साईक्स एक्स्टेंशन, न्यू शाहुपूरी, खानविलकर पेट्रोलपंप, शाहुपूरी व्यापारपेठ, व्हीनस कॉर्नर, शाहुपूरी 1 ते 4 गल्ली, बी.टी.कॉलेज, टेंबलाई वाडी आणि पाच बंगला परिसरातही पाणीपुरवठा होणार नाही.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. दुरुस्तीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, असेही सुचवण्यात आले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी महानगरपालिका कसोशीने प्रयत्न करत असून, बुधवारपासून पाणीपुरवठा हळूहळू पूर्ववत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.