TRENDING:

मत्स्य व्यवसायाच्या शिक्षणानंतर या आहे करिअरच्या संधी, कोल्हापुरातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:

शिवाजी विद्यापीठात प्राणीशास्त्र विभागात मत्स्य व्यवसाय संदर्भात शिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमात चार सेमिस्टरमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : सध्याच्या काळात नोकरी किंवा रोजगार मिळवताना बरीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षण घेऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी बरेचसे विद्यार्थी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, यासोबतच मत्स्यव्यवसायाच्या क्षेत्रात देखील स्वयंरोजगार आणि परदेशातील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जर विद्यार्थ्यांनी ठरवले तर या क्षेत्रात चांगले करिअर घडवू शकतात. याबाबतची माहिती कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील मत्स्य व्यवसाय विषयाच्या प्राध्यापकांनी माहिती दिली.

advertisement

शिवाजी विद्यापीठात प्राणीशास्त्र विभागात मत्स्य व्यवसाय संदर्भात शिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमात चार सेमिस्टरमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये गोड्या पाण्यातील, खाऱ्या पाण्यातील, निम खाऱ्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाबाबत शिकवले जाते. त्याचबरोबरीने माशांना देखील विविध प्रकारचे रोग होत असतात. त्यांच्यावर औषधोपचार कशा करायचा, हे देखील या अभ्यासक्रमात शिकवले जाते. तसेच या मत्स्य व्यवसायातील विपणन धोरणदेखील विद्यार्थ्यांना यातून अभ्यासता येते, अशी माहिती प्रा. डॉ. एम. पी. भिलावे यांनी लोकल18 शी बोलताना दिली आहे.

advertisement

तब्बल 100 वर्षांनी एकाच वेळी गजकेसरी अन् शश राजयोग, 3 राशीच्या लोकांना होणार मोठा फायदा

कोणकोणत्या आहेत संधी?

व्यवसायाचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार स्वतः करू शकतो. जे विद्यार्थी मत्स्य व्यवसायाची पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडतात. त्यांच्यासमोर सुरुवातीला एक सोपा सर्वात चांगला पर्याय उपलब्ध असतो.

1) आजकाल बऱ्याच घरांमध्ये किंवा हॉटेलमध्ये काचपेटीमध्ये मासे पाळलेले आसतात. अशावेळी मत्स्य व्यवसाय शिकलेली मुले त्यांच्याकडे जाऊन दर आठवड्याला वेगैरे त्यांची काचपेटी साफ करून देऊ शकतात. अशाप्रकारे ते स्वतःसाठी स्वयंरोजगार निर्मिती करु शकतात.

advertisement

2) शेततळी तयार करणे हा देखील एक उत्तम उपाय ठरू शकतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपास बरीचशी क्षारपड जमीन आहे. अशा ठिकाणी गवत सुद्धा उगवून येत नाही. त्यामुळे ही क्षारपड जमीन करारावर घेऊन त्याठिकाणी मत्स्यव्यवसाय किंवा कोळंबीचा केला जाऊ शकतो.

heatstroke : उन्हाळ्यात वाढला आजारांचा धोका, या गोष्टी ठरतील शरीराला खूपच फायदेशीर

advertisement

3) महाराष्ट्र बाहेर मत्स्यव्यवसायाशी निगडील बहुराष्ट्रीय कंपनी आहेत. मात्र, बरेचजण आपले राहते घर, ठिकाण सोडून कामासाठी बाहेर जाऊ इच्छित नाहीत. पण परदेशातही बऱ्याचशा कंपनी, मत्स्यालय, मत्स्यसंग्रहालय अशा ठिकाणी देखील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

एकूणच मत्स्य व्यवसायाचे शिक्षण घेतल्यानंतर स्वयंरोजगार आणि बाहेरच्या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी आपला विचारांचा परिघ वाढवला पाहिजे. तरच त्या संधीचा लाभ घेता येईल आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील आपले करिअर सेट करता येईल, असेही भिलावे यांनी स्पष्ट केले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
मत्स्य व्यवसायाच्या शिक्षणानंतर या आहे करिअरच्या संधी, कोल्हापुरातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल