याबाबत मिळालेली माहिती असी की, अहमदपूर तालुक्यातील किनगाव आंबेजोगाई रोडवरील दगडवाडी येथे महामार्गावर तेलंगाना राज्यातील ट्रक हा आंबेजोगाईकडून अहमदपूरकडे जात होता. तेव्हा हा ट्रक दगडवाडी येथे एका हॉटेल समोर थांबला होता. त्याचवेळी किनगाव कडून जोडवाडीकडे जात असताना टाटा सुमोने या ट्रकला जोराची धडक दिली आणि अपघात झाला.
अपघातात विजयमाला गंगाधर सिरसाट (45), सावित्री हरी सिरसाट आणि एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर टाटा सुमोत प्रवासी अडकले होते. त्यांना दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं. स्थानिकांनी अपघातातील जखमींना बाहेर काढलं. टाटा सुमो चालक अच्युत सिरसाट, जयश्री ज्ञानेश्वर सिरसाट व एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी आंबेजोगाई येथील दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2024 6:35 AM IST
