मारामारीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'सुपारी खाण्या'सारख्या किरकोळ कारणावरून ही हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना उदगीर शहरातील चौबारा भागात घडली. या घटनेमध्ये एक तरुण हातात कोयता घेऊन दुसऱ्या तरुणावर वार करताना दिसत आहे. तर दुसरा जखमी तरुण हातात कत्ती घेऊन पहिल्यावर वार करताना दिसत आहे. यावेळी घटनास्थळी अनेक लोक उपस्थित होते, पण कोणीही वाद सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, उलट काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये याचे चित्रीकरण केले.
advertisement
या प्रकरणी अराफत रोशन शेख (वय २४) या मजुरी करणाऱ्या तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अराफतच्या तक्रारीनुसार, आरोपी सलमान लियाज शेख याने त्याला "तुझी सुपारी खायची लायकी आहे का?" असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर हा सिनेस्टाईल राडा झाला. या संपूर्ण घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडीओत संवेदनशील दृश्ये असल्याने न्यूज १८ लोकमत हा व्हिडीओ पब्लिश करू शकत नाही.
पण या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उदगीर शहर पोलीस ठाण्यात सलमान शेखविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही तरुण एकमेकांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यामुळे दोघांचे कपडे रक्ताने माखल्याचं व्हिडीओत दिसत आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.