किरकोळ कारणातून खून
नमस्कार का घातला? या किरकोळ कारणावरुन झालेल्या हाणामारीत एकाचा गुप्तीने भोसकून खून करण्यात आला आहे तर एकजण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना औसा तालुक्यातील होळी गावात काल रात्री उशीरा घडली आहे. होळी या गावातील महादेव केरबा यादव आणि त्यांचा लहान भाऊ संभाजी केरबा यादव सकाळी घरासमोर बसले होते. गावातील काही तरुणांनी त्यांना नमस्कार घातला होता. यावरून वाद वाढला आणि तो वाद विकोपाला गेला. सकाळी शाब्दिक बाचाबाचीही झाली होती. यादव बंधूचे प्रकाश जाधव यांच्या बरोबर अनेक दिवसांपासून वाद होते. त्यातच सकाळी नमस्कार का घातला यावरूनही वाद उफाळून आला होता. रात्री यादव बंधू यांनी सकाळच्या घटनेचा जाब विचारण्यासाठी प्रकाश जाधव यांच्या घराकडे गेले. त्यावेळी प्रकाश व्यंकट जाधव, सतीश व्यंकट जाधव या दोन भावांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार सुरू केले.
advertisement
वाचा - शरद मोहोळच्या हत्येबद्दल पहिल्यांदाच पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती, मारेकऱ्याबद्दल EXCLUCIVE अपडेट
या जबर हल्ल्यात महादेव याचा जागीच मृत्यू झाला असून लहान बंधू संभाजी गंभीररित्या जखमी झालाय. महादेव यादव याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे अनेक वार आहेत. याबाबत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरोपी रात्रीच फरार झाले आहेत. त्यांच्या शोधात औसा पोलीसांनी तिन पथके तयार केले आहेत. मध्यरात्रीच आरोपीच्या शोधात पथके रवाना झालेत.
