प्रियंका गांधी यांची लातूरमध्ये शनिवारी सभा झाली. या सभेबाबत बोलताना अमित देशमुख यांनी म्हटलं की, त्या आल्या त्यांनी पाहिल आणि त्यांनी जिंकल अशीच कालची प्रिंयका गांधी यांची सभा होती. १० वर्षात त्यांनी काय केलं? कालच्या सभेनं लातुरच्या विजयावर शिक्कामोर्तब झालंय. आमदार खासदार यांचा काही संदर्भ आता या निवडणूकीत राहिला नाहीय.
advertisement
कालपर्यंत जे आमच्याकडं होते ते आज तिकडं गेलेत. विलासराव असते तर आज ही वेळ आलीच नसती. अशी ही पक्षांतरे कधीच झाली नसती. ते असते तर निश्चितच कॅांग्रेसची परिस्थिती बिकट राहिलीच नसती. आम्हा सगळ्यांना आधार राहिला असता तर एवढी वाताहत झाली नसती हे सर्व जणच मान्य करतात.आता कॅांग्रेस कामाला लागली आहे लोकांशी जुळायला भारत जोडो यात्रेनं सुरू झालीय. इथून पुढच्या राजकारणात व्हायला सुरू झाली असल्याचं अमित देशमुख म्हणाले.
अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसला रामराम करत भाजपची वाट धरली. यावरही अमित देशमुख यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, अशोकरावांच्या पक्षांतरानं आमच नुकसान झालंय यात कसलीही शंका नाही, पण ते जरी गेले असले तरी सामान्य कार्यकर्ता काँग्रेसचाच आहे. फोटो काढण्यापुरताच भाजपचा स्कार्फ घातला जातोय हीच ती परिस्थिती आहे. अशोक चव्हाण एकटेच भाजपात गेले आहेत.
आम्ही आहेत तिथेच आहोत आणि तिथेच राहूत आमच्याबद्दल संशय निर्माण करून कोणी राजकीय पोळी भाजत असावेत. विलासराव देशमुख असते तर काँग्रेसची बार्गेनिंग पावर नक्कीच वाढली असती. पण आघाडीच्या राजकारणात तडजोडी होतच राहतात, शिवसेना आणि राष्ट्रवादीही तडजोडी करतच आहेत. देशात बदल घडवायचा असेल तर त्यावरच काम कराव लागेल. उद्या आश्चर्यकारक निकाल लागले तर कोणाला अतिशयोक्ती वाटू नये.
महायुतीमध्ये एकही चेहरा नाही हीच परिस्थिती, लोकांचा पाठिंबा त्यांना मिळत नाही. यावर त्यांना विचार करायला हवा की आपण कुठे चुकलो. महायुतीच्या नेत्यांचं अपयश आता दिसायला लागलंय जिथे पंतप्रधान मोदींनाच यावं लागतंय. जनतेनं ही निवडणूक हाती घेतलीय, महाविकास आघाडी महायुतीच्या पुढे राहिल असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
विलासराव देशमुखांच्या फोनचा किस्सा सांगताना अमित देशमुख म्हणाले की, पोलिसांनी कोणाला सिग्नलला पकडलं की थेट लोक विलासरावांना फोन करायचे, ट्रकला आर टी ओ ने पकडलं किंवा कचेरीत काम होत नसेल तर थेट फोन सी एमला, विलासराव स्वत:च फोन घ्यायचे हा त्यांचा स्वभाव होता. जनतेला ही एक आपुलकी होती आणि ते तसं रहावं म्हणून आम्ही हा एक प्रयत्न केलाय.
