बीड: राज्याच्या राजकारणामध्ये मातब्बर असलेल्या मुंडे कुटुंबाला मानणारा एक वर्ग आहे. भाजपाचे दिवंगत राष्ट्रीय नेते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे याचा राजकीय वारसा चालवणाऱ्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या पाठोपाठ आता यशश्री मुंडे ही राजकारणामध्ये एंट्री करत आहेत. कारण आहे वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचे. यात यशस्वी मुंडे यांनी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी घेतला. अर्ज दाखल केला आहे. यावरून आता तिसरी कन्या राजकारणात सक्रिय होत असल्याची चर्चा आहे.
advertisement
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी हयातीत 2009 साली पंकजा मुंडे यांना प्रत्यक्ष परळी विधानसभा लढवत सक्रिय केले. याच वेळी पुतण्या धनंजय मुंडे यांनी वेगळे होत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. काका पुतण्यांचा संघर्ष यावेळी मुंडेंची वारसदार म्हणून पंकजा मुंडे समोर आल्या. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचाराची पूर्ण धुरा सांभाळली. स्वर्गीय मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडे मंत्री झाल्या तर प्रीतम मुंडे यांची राजकारणात एंट्री होत मुंडेंच्या जागेवर खासदार म्हणून संधी मिळाली. सलग दहा वर्ष खासदार म्हणून काम पाहिलं. यावेळी यशश्री मुंडे या शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर होत्या. तसंच राजकारणात कुठेही सक्रियही दिसल्या नाहीत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज भरताना यशश्री मुंडे पाहायला मिळाल्या. तसंच या अगोदर संचालक म्हणून वैद्यनाथ साखर कारखान्यावरही काम पाहिलं. मात्र जिल्हाभर संपर्क असलेल्या वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्यांनी सहभाग घेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 10 ऑगस्टला मतदान होणार आहे. त्यावरून आता सहकार क्षेत्रातून यशश्री मुंडेंची राजकारणात प्रवेश होत आहे का अशी चर्चा रंगली आहे.
राजकारणात सक्रिय झाल्या तर उच्चशिक्षित असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तर त्या सक्रिय होत असल्याचा आनंद ही व्यक्त केला. बँकिंग क्षेत्रामध्ये उच्चशिक्षित संचालक मिळत असेल तर आनंदाची गोष्ट आहे, असं माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा ,
भाजपा सरचिटणीस चंद्रकांत फड यांनी सांगितलं.
परळीची जबाबदारी यशश्री मुंडेंना दिली जाणार?
यशश्री मुंडे यांच्या राजकीय प्रवेशावर राजकीय जाणकारांनी प्रतिक्रिया देताना परळी सांभाळण्याची जबाबदारी देण्याच्या दृष्टिकोनातून यशश्री मुंडेंना सक्रिय केल्या जात असल्याचे मत व्यक्त केलं. तसंच समाजकारण आणि राजकारण याची सांगड घालता यावी यासाठी सहकार क्षेत्र बँकेपासून सुरुवात केल्याचाही मत व्यक्त केलं.
मुंडे कुटुंबातील तिसरी कन्या राजकारणात पुन्हा सक्रिय होते का, बँकेच्या क्षेत्रातून एंट्री केल्यानंतर राजकीय क्षेत्रात खरंच यशश्रीला यश मिळते का? पंकजा मुंडे यशश्री यांच्या माध्यमातून पुन्हा हातातून गेलेले होम बीच परळीत मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली करत आहेत का? यासह अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याचे उत्तर आगामी काळच देईल.
कोण आहे यशश्री मुंडे?
यशश्री मुंडे या दिवंगत भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या आहेत. भाजपच्या नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या भगिनी आहेत.
शिक्षण आणि व्यवसाय
यशश्री मुंडे यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एलएलएम (LL.M.) पदवी प्राप्त केली आहे आणि त्या पेशाने वकील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांना कॉर्नेल विद्यापीठाकडून 'प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट' (Promising Asian Student) म्हणून गौरवण्यात आलं होतं.
यशश्री राजकारणापासून आतापर्यंत दूर रााहिल्या आहेत. मात्र, मागील काही वर्षांमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचार दौऱ्यात आणि दसरा मेळाव्यासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी हजेरी लावली. पण आता यशश्री मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या वकील कन्या आहेत आणि आता त्यांनी वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात आपले पहिले पाऊल टाकलं आहे.
