TRENDING:

तुम्ही ओबीसीत आलात, आता आपल्यात विवाह झाले पाहिजेत, लक्ष्मण हाके यांचा मराठा समाजाला विवाह प्रस्ताव

Last Updated:

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत असताना दुसरीकडे लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचाव म्हणत राज्यभरात जाऊन भूमिका मांडत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण हवे, अशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका असताना त्याच भूमिकेवरून ओबीसी लक्ष्मण हाके यांनी कोंडीत पकडले आहे. तुम्ही आता आमच्यात आलाच आहात, यायचा प्रयत्न करता आहात तर आता आमच्यातल्या सर्वगुणसंपन्न पोरांशी तुमच्या पोरींची लग्नही लावा, असे म्हणत मनोज जरांगे यांच्यासमोर विवाह प्रस्ताव ठेवला.
लक्ष्मण हाके-मनोज जरांगे
लक्ष्मण हाके-मनोज जरांगे
advertisement

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत असताना दुसरीकडे लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचाव म्हणत राज्यभरात जाऊन भूमिका मांडत आहेत. दरम्यान, अनेक वेळा दोघांमध्ये शाब्दिक चकमकी उडत आहेत.

लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यासमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर सभेत मांडला. कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा समाज ओबीसीमध्ये येत असेल, तर ओबीसी समाजातील सुशिक्षित मुला-मुलींचे विवाह मराठा समाजातील मुला-मुलींशी जुळवून देण्याचे आव्हान त्यांनी दिले.

advertisement

मराठा समाज हा लग्न करताना ९६ कुळी, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्या मागासवर्गीय

लक्ष्मण हाके म्हणाले, मराठा समाज हा लग्न करताना ९६ कुळी, क्षत्रिय मराठा वगैरे सांगतो. पण ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्या की तो मागासवर्गीय होतो, ओबीसी होतो. असे मी सांगत नाही तर एनडी पाटील सांगायचे. आता माझे म्हणणे आहे की तुम्ही ओबीसीत आलात, आता आपल्यात विवाह झाले पाहिजेत.

advertisement

कोण आहेत लक्ष्मण हाके?

लक्ष्मण हाके हे आपल्या अनोख्या आंदोलनामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे कार्याध्यक्षपदावर काम केले आहे. तर मागील काही वर्षात अनेक ओबीसी मोर्चे आंदोलनात सक्रिय सहभागी असल्याचे दिसून आले आहे. यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजच्या वेशात जाऊन लक्षवेधी आंदोलन केले होते. माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी महात्मा फुलेंसारखी वेषभूषा करत त्यांच्यासारखे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुम्ही ओबीसीत आलात, आता आपल्यात विवाह झाले पाहिजेत, लक्ष्मण हाके यांचा मराठा समाजाला विवाह प्रस्ताव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल