पहिल्या यादीत नसल्याने नाराजी
पुण्यातील विद्यमान आमदार भीमराव तापकीर सागर बंगल्यावर दाखल झाले. भीमराव तापकीर यांचं नाव यादीत नाहीय. त्यामुळे ते भेटीसाठी दाखल झाले होते. भेटीनंतरही भीमराव तापकीर हे नाराज असल्याचं दिसून आलं. माध्यमांशी संवाद न साधता ते निघून गेले. तर मावळचे आमदार सुनील शेळकेंविरोधात भाजपचे बाळा भेगडे हे इच्छुक आहेत. तेसुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले होते.
advertisement
तिकीट मिळूनही पाचपुते नाराज
श्रीगोंद्यातून भाजपने बबनराव पाचपुते यांच्या पत्नीला उमेदवारी दिलीय. तरीही पाचपुते कुटुंबिय नाराज आहेत. पत्नीला नव्हे तर पाचपुते यांनी मुलासाठी उमेदवारी मागितली होती. बबनराव पाचपुते यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही आहेत. दुसरीकडे सुवर्णा पाचपुते यांच्याकडूनही बंडाचा झेंडा उंचावण्यात आलाय. त्या श्रीगोंद्यातून इच्छुक होत्या.
Maharashtra Elections 2024 : मोठी बातमी! ठाकरे गटाकडून 288 जागा स्वबळावर लढण्याची तयारी?
मुरजी पटेल फडणवीसांच्या भेटीला
अंधेरी पूर्व येथून इच्छुक मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. भाजपकडून अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी अर्ज भरला होता. मात्र अर्ज भरल्यानंतर पक्षाने सांगितल्याने त्यांनी माघार घेतली होती. सध्या या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या आमदार आहेत. तर लोकसभेत या ठिकाणी महायुतीला मताधिक्य मिळालं होतं.
