TRENDING:

शेअर मार्केटमध्ये झाला मोठा लॉस, ज्योतीने बहिणीच्या सासऱ्याच्या घरी टाकला दरोडा, तब्बल दीड कोटींचे दागिने केले गायब

Last Updated:

चोरी केलेले १४९०.८६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २३२० ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने असा रुपये १,५०,८४,०५० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नालासोपारा:   शेअर बाजारात पैसे गमावल्यामुळे घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिसांनी दीड कोटीचे दागिने अवघ्या बारा तासाच्या आत जप्त केले आहे. या प्रकरणी या तरुणीला अटक करण्यात आली आहे.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओधवजी खिमजी भानुशाली (वय ६६) हे घरात एकटेच असताना एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून, 'मला रूम हवी आहे. मला मदत करा' असं सांगून घरात घुसला. भानुशाली यांनी आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूममध्ये जायचं असं सांगून वॉशरूममध्ये गेला आणि तुमचं बाथरूम लिकेज झाला आहे, असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूममध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवलं आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला. कसंबसं बाथरूममधून बाहेर आल्यानंतर लक्षात आलं की घरातील दागिने चोरीला देले आहे.

advertisement

गुजरातमध्ये सापडली ज्योती

भानुशाली यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आणि  घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता त्या सीसीटीव्ही मध्ये बॅगा हातात, घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेष धारण केलेला इसम दिसला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेनं येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी इथं पोहोचले. तिथे गेल्यावर ज्योती मोहन भानुशाली (वय २७) हिला ताब्यात घेतलं. तिच्याकडे दीड कोटी रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. पुरुषाचा वेष धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्रामवरील मिम्स पाहून केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

advertisement

ज्योतीने पुरुष बनून केली चोरी

ज्योतीने आपल्यात नातेवाईकाच्या घरात अत्यंत शिताफीने चोरी केली. मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळ आणि पुढे अदांजे ७५/८० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यामध्ये गुन्हा करणाऱ्या इसमाने चोरी केलेला माल एका ठिकाणी ठेवला. काही वेळाने एक महिला अर्थात ज्योती तिथे आली आणि चोरीचा माल घेऊन गेली. त्यानंतर पुरुष चोर कुठेही दिसून आला नाही. यामुळे सदर चोरीमध्ये महिलेचाही समावेश असल्याचं दिसून आले. सीसीटीव्ही मध्ये दिसून येत असलेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषण अंती केलेल्या तपासामध्ये फिर्यादी यांच्या गुजरात येथील नातेवाईकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

advertisement

शेअर मार्केटमध्ये पैसे गमावले म्हणून बहिणीच्या सासऱ्याच्या घरात चोरी

त्याप्रमाणे मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे एक पथक नवसारी, गुजरात येथे रवाना करण्यात आलं. गणदेवी पोलीस ठाणे (नवसारी, गुजरात) पोलीसांच्या मदतीने महीला नामे ज्योती मोहन भानुशाली, वय २७ हिला ताब्यात घेउन चौकशी करता स्वतःच्या सख्या बहीणीचे सासरे एकटे असल्याचे माहित असल्याने तिने ओळखू येऊ नये म्हणून पुरुषाचे रुप धारण करुन रूम पाहिजे असं सांगून घरात घुसली आणि चोरी केली. बहिणीच्या सासऱ्याला घरात बाथरूममध्ये कोंडुन ठेवून फिर्यादीच्या बेडरूममधील कपाट चावीच्या मदतीने उघडून कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने इ, चोरी करून गुन्हा केल्याचं सांगितलं. चोरी केलेले १४९०.८६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २३२० ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने असा रुपये १,५०,८४,०५० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शेअर बाजारामध्ये पैसे गमावल्यामुळे ज्योतीने चोरी केल्याचं कबुल केलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, निकेत कौशिक, मिरा भाईंदर वसई विरार यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे तसंच अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे साो व सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाप्रमाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविराज कुराडे, सपोनि प्रशांत गांगुर्डे, सपोनि दत्तात्रय सरक, सपोउपनि संतोष मदने, मनोहर तावरे आसिफ मुल्ला, पोहवा-प्रविणराज पवार, समीर यादव, शिवाजी पाटील, धनजंय चौधरी, गोविद केंद्रे, रविंद्र भालेराव, विकास राजपुत, रविंद्र कांबळे, हनुमंत सुर्यवंशी, विजय गायकवाड पोलीस अंमलदार नितीन राठोड, अंगद मुळे व मसुब सचिन चौधरी तसेच सपोउनि. संतोष चव्हाण,सायबर गुन्हे यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास माणिकपुर पोलीस ठाण्या मार्फत करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेअर मार्केटमध्ये झाला मोठा लॉस, ज्योतीने बहिणीच्या सासऱ्याच्या घरी टाकला दरोडा, तब्बल दीड कोटींचे दागिने केले गायब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल