मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारातील संतोष भवन परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या भागात खराब रस्त्याने एका तरुणाचा बळी घेतला आहे. महेश देसाई असं मृत तरुणाचं नाव आहे. महेश देसाई हे आपल्या स्कुटीवरून चालले होते. पण अचानक त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या ट्रक जात होता. महेश देसाई हे ट्रकच्या चाकाखाली सापडून त्यांचा चेंदामेंदा झाला. तसंच त्यांच्या मागे बसलेला लवकुश वर्मा हे गंभीर जखमी झाले.
advertisement
या घटनेनंतर घटनास्थळी लोकांनी धाव घेतली. जखमी लवकुश वर्मा यांना तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवलं आहे. मयत महेश देसाई हे डोम्स कंपनीत मॅनेजर पदावर होते तर त्यांच्यासोबत चा लवकुश वर्मा हे डोम्स कंपनीत मार्केटिंग पदावर होते. अपघातानंतर ड्रायव्हर पळून गेला होता. त्यामुळे संतप्त लोकांनी ट्रकची तोडफोड केली. त्यावेळी काही अज्ञात तरुण मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी ट्रकला पेटवून दिलं.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी महेश देसाई यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणात ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहे. मात्र, ट्रकला आग ही आग ट्रक चालकाच्या माणसांनीच लावली असल्याचा आरोप करण्यात स्थानिकांनी केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहे.
