TRENDING:
LIVE NOW

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 Live: पिंपरी चिंचवडमध्ये मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार?

Last Updated:

महानगरपालिका निवडणूक निकाल Live : राज्यातील 29 महापालिकांच्या निकालासाठी आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार, महायुतीला वर्चस्व मिळवता येईल का यावर सर्वांचे लक्ष आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राज्यात आज 29 महापालिकांसाठी मतदान झालं. आज त्याचा फैसला होणार आहे. महानगरपालिकांवर कुणाचं वर्चस्व राहणार? राज्यात महायुतीला सत्ता स्थापन करण्यात यश मिळालं मात्र 29 महानगरपालिकांवर महायुतीला वर्चस्व मिळवता येणार का याचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
News18
News18
advertisement
Jan 16, 20268:13 AM IST

पिंपरी चिंचवडकर कुणाचं पारडं जड करणार भाजप की राष्ट्रवादी? थोड्याच वेळात येणार पहिला कल

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर मतदानाचा निकाल आज जाहीर होत आहे. 128 जागांसाठी 692 उमेदवार रिंगणामध्ये होते मात्र इथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होती त्यामुळे पिंपरी चिंचवड करांनी नक्की कॉल कुणाला दिला आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. आठ मतमोजणी केंद्रांवरून हा निकाल जाहीर केलं जाईल. पिंपरी चिंचवड मध्ये 57.71% एवढं मतदान झालंय हा मतदानाचा टक्का खरंतर घसरला आहे. घसरलेला टक्का कोणाचं पारडं जड करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले
Jan 16, 20268:11 AM IST

Solapur Municipal Corporation Election Result : सोलापूर महापालिकेचे कारभारी कोण?

10 वाजता होणार मतमोजणीला सुरुवात
102 जगाची 7 ठिकाणी होणार मतमोजणी
प्रशासनाने मतदानाची तयारी केली पूर्ण
ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात
Jan 16, 20268:02 AM IST

pune: निकालापूर्वी पुण्यात बॅनरबाजी, गणेश बिडकर यांचा महापौर साहेब उल्लेख

पुण्यात निकाला आधीच गणेश बिडकर यांचे बॅनर लागले. बॅनरवर गणेश बिडकर यांचा महापौर साहेब असा उल्लेख करण्यात आला आहे. नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दलचे लागले बोर्ड, त्यामुळे चर्चांना उधाण आलं. पुण्यात भाजपचे गणेश बिडकर vs प्रणव धंगेकर अशी चुरशीची लढत आहे.
advertisement
Jan 16, 20267:56 AM IST

पिंपरी चिंचवडमध्ये मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार?

128 जागांसाठी 692 उमेदवार रिंगणामध्ये होते, मात्र इथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होती त्यामुळे पिंपरी चिंचवड करांनी नक्की कौल कुणाला दिला आहे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. आठ मतमोजणी केंद्रांवरून हा निकाल जाहीर केला जाईल. पिंपरी चिंचवड मध्ये 57.71% एवढं मतदान झालं आहे. मागील वेळे पेक्षा ही मतदान कमी झालं आहे त्यामुळे हा मतदानाचा टक्का खरंतर घसरला आहे. घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले
Jan 16, 20267:19 AM IST

पुण्यात कमी मतदानाचा फटका नेमका कुणाला?

पुण्यात एकूण ५२.४२ टक्के मतदान काल उशिरा टक्केवारी जाहीर करण्यात आली १६३ जागांसाठी ५२.४२ टक्के इतके मतदान एकूण ३५ लाखापैकी १८ लाख ६२ हजार ४०८ जणांनी बजावला मतदानाचा हक्क मागच्या वेळी पेक्षा जवळपास ३.५० टक्के कमी मतदान २०१७ मध्ये ५५.५६ इतके झाले होते मतदान पुण्यात कमी मतदानाचा फटका नेमका कुणाला?
Jan 16, 20267:17 AM IST

जळगाव महापालिका : 63 जागांसाठी 53.59 टक्के मतदान !

जळगाव महापालिकेच्या 75 पैकी 63 जागांसाठी गुरुवारी शहरात 53.59 टक्के मतदान पार पडलं. सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाने दुपारनंतर वेग घेतला. दुपारी तीनपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर तुरळक मतदार उपस्थिती होती, मात्र चार वाजल्यानंतर अचानक मतदारांची गर्दी वाढून लागली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 2.18 टक्के मतदान घटल्याने निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता कमी मानली जातेय. मतमोजणी वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी दहा वाजल्यापासून होणार असून, शहरातील 19 प्रभागांतील 321 उमेदवारांचे भवितव्य 122 फेर्‍यांत स्पष्ट होईल. प्रशासकीय नियोजनानुसार दुपारी दोनपर्यंत जळगावचा कारभारी कोण हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची, त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी होणार आहे.
advertisement
Jan 16, 20267:15 AM IST

मतदानाचा टक्का घसरला, मतदार यादीत असलेला घोळ, दुबार नावे, आणि मतदान केंद्र बदली झाल्याचा फटका मतदानावर

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ नंतर तब्बल ९ वर्षांनंतर होत असल्याने महापालिकेची यंत्रणा सज्ज झालीये. शहरातील वेगवेगळ्या भागांतील २ हजार ६७ मतदान केंद्रात मतदान पक्रिया पार पडली. यंदा मतदारांचा कौल काहीसा कमी असल्याचं दिसून आले. मतदानाची टक्केवारी घसरली असून ५७.७१% इतकेच मतदान झाले असून यात ५ लाख २५ हजार १४७ पुरुष तर ४ लाख ६३ हजार ८२७ महिलांनी तसेच इतर ५२ जणांनी मिळून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. शहरात तब्बल १७ लाख १३ हजार ८९१ इतके मतदार असून त्यापैकी फक्त ९ लाख ८९ हजार २६ मतदारांनी मतदान केले. दरम्यान फेब्रुवारी २०१७ ला झालेल्या निवडणुकीत ११ लाख ९२ हजार ८९ पैकी ७ लाख ७९ हजार ६० जणांनी मतदान केले. त्यावेळी ६५.३५. इतके मतदान झाले होते. चार सदस्यीय एकूण ३२ प्रभागांसाठी हे मतदान पार पडले त्यातील दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर मतदान केंद्रांवरील १२८ पैकी १२६ जागांसाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनेचे तसेच, बंडखोर व अपक्ष उमेदवार असे ६९७ जणांचे नशीब ईव्हीएममध्ये सीलबंद झाले असून आज मतमोजणी असून सगळ्यांचे लक्ष या लढतीकडे लागले असून यंदा महापौर कोणत्या पक्षाच्या असणार आहे त्यावर राजकीय पक्षात दावे प्रतिदावे करण्यात येत असून प्रत्येक उमेदवाराला खात्री आहे आपलाच विजय होणार
Jan 16, 20267:12 AM IST

20 बिनविरोध नगरसेवक निवडून आल्याने लोकांमध्ये नाराजी..

कल्याण-डोंबिवली मधील नागरिकांनी मतदान करून मतदानाचा % वाढवला..
52% मतदान झाले, मतदानाचा आकडा वाढला…
10 वर्षापूर्वी साधारण 45% मतदान होते, ते आता 52% झाले..
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६  साठी ५२.११ % मतदान झाले.
Jan 16, 20267:12 AM IST

वसई विरार महानगरपालिकेत किती मतदान झालं?

वसई विरार शहर महानगरपालिका
सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६
सकाळी ७.३० ते सायं.५.३० वा. झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी- ५७.१२%
advertisement
Jan 16, 20267:05 AM IST

Municipal Corporation Election Result Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाचा महापौर होणार?

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीसाठी झाले एकूण 59.82 टक्के एवढे मतदान… कुणाचा होणार महापौर याचीच उत्सुकता… संभाजीनगरमधून 115 सदस्याच्या 29 प्रभागांमधून 859 उमेदवार होते रिंगणात.. सर्वच पक्ष स्वबळावर लढल्याने निवडणूक रंगतदार झाली होती.. आज होणार संभाजीनगर महापालिकेचा फैसला… अविनाश कानडजे छत्रपती संभाजीनगर,
Jan 16, 20266:58 AM IST

Thane Municipal Corporation election Result Live: ठाण्यात कुठे किती झालं मतदान?

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 917123 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, एकूण 55.59 टक्के मतदान प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी : माजिवडा प्रभागसमिती – प्रभाग क्रमांक 1,2,3,8 – 54.75% वर्तकनगर प्रभाग समिती – प्रभाग क्रमांक 4,5,7 54.86 % लोकमान्य सावरकरनगर –
प्रभाग क्रमांक 6,13,14,15– 58.09% वागळे प्रभाग समिती –
प्रभाग क्रमांक 16,17,18—- 55.53% नौपाडा कोपरी –
प्रभाग क्रमांक 19,20,21,22—- 59.79% उथळसर –
प्रभाग क्रमांक 10,11,12– 60.60 %
कळवा
प्रभाग क्रमांक 9,23,24,25 — 54.29 % मुंब्रा
प्रभाग क्रमांक 26, 31— 47.59%
मुंब्रा प्रभाग क्रमांक 30,32 —-49.15% दिवा
प्रभाग क्रमांक. 27,28 —- 57.37%
दिवा प्रभाग क्रमांक. 29,33 —- 56.45 %
Jan 16, 20266:52 AM IST

Nagpur Municipal Corporation election result Live : नागपुरातील महत्त्वपूर्ण लढती, बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

नागपुरातील प्रमुख लढतींकडे आज लक्ष, कुठे होणार टफ फाईट प्रभाग 1 ड
– विक्की कुकरेजा, भाजप
– सुरेश जग्यासी, कॉंग्रेस प्रभाग 2 अ
– सरिता माने भाजप,(भाजप माजी आमदार पत्नी)
– भावना लोणारे, कॉंग्रेस
– प्रीती बोदोले, बसपा प्रभाग 8 ड
– श्रेयस कुंभारे भाजप (मुलगा,माजी आमदार विकास कुंभारे)
– खान वासिम, कॉंग्रेस
– भुट्टो जुल्फिकार अपक्ष (कॉंग्रेस बंडखोर) प्रभाग 14 ड
– प्रगती पाटील भाजप
– अभिजित झा, कॉंग्रेस
– सुनील अग्रवाल, अपक्ष (भाजप बंडखोर) प्रभाग 18 अ
– बंडू राऊत भाजप
– प्रकाश बानते कॉंग्रेस
– धीरज चव्हाण अपक्ष (बंडखोर भाजप) प्रभाग 21 क
– आभा पांडे , राष्ट्रवादी (अजित पवार)
– निशा भोयर, भाजप
– ऋतिका डाफ, कॉंग्रेस प्रभाग 22 ड
– श्रीकांत आगलावे, भाजप(संघ मुख्यलाय प्रभाग)
– नाना झोडे, कॉंग्रेस प्रभाग 23 ड
– बाल्या बोरकर, भाजप
– दूनेश्वर पेठे, शरद पवार गट(शहर अध्यक्ष)
– गणेश हुमने, कॉंग्रेस प्रभाग 28 ड
– किशोर कुमेरीया, उबाठा
– किरण दातीर, भाजप
– श्रावण सोनटक्के कॉंग्रेस
– नितीन तिवारी, बंडखोर, उबाठा प्रभाग 36 –
– शिवानी दाणी, भाजप
– संजीवनी मेघरेला, काँग्रेस #कोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला – भाजप – – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
– चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
– प्रवीण दटके,भाजप आमदार
– कृष्णा खोपडे, भाजप आमदार
– मोहन मते, भाजप आमदार # काँग्रेस –
– आ. विकास ठाकरे, शहराध्यक्ष
– डॉ. नितीन राऊत, काँग्रेस
– प्रफुल गुडधे, काँग्रेस नेते
– विजय वडेट्टीवार
– नाना पाटोले # शिवसेना (शिंदे)-
– आशिष जैस्वाल, मंत्री,शिवसेना,शिंदे
– कृपाल तुमाने, उपनेते, शिवसेना, शिंदे
– किरण पांडव, शिवसेना,शिंदे # शिवसेना (ठाकरे) –
– सतीश हरडे, संपर्क प्रमुख
– किशोर कुमेरिया, जिल्हा प्रमुख # राष्ट्रवादी (शरद पवार) –
– अनिल देशमुख, माजी मंत्री
– दूनेश्वर पेठे, शहराध्यक्ष # राष्ट्रवादी (अजित पवार)
– राजू जैन, नेते
– प्रफुल पटेल
– अनिल अहिरकर, शहराध्यक्ष
advertisement
Jan 16, 20266:51 AM IST

नागपूर महानगरपालिका निवडणूक निकाल: भाजप सेना युती सलग आपली सत्ता राखणार का?

बेमीसाल 20 चा नारा देत लढणारी भाजप सेना युती सलग आपली सत्ता राखणार का? की भाजप चा गड ढासळून काँग्रेस सत्तेत येणार याचा फैसला काल मतदारराजानी EVM मध्ये कैद केला आहे, आज मतमोजणी नंतर नागपूर महानगर पालिकेत कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होणार आहे. – नागपूर महानगर पालिका, एकूण जागा – 151
– एकूण उमेदवार – 993
– भाजप – शिवसेना (शिंदे) युती
– भाजप – 145
– शिवसेना (शिंदे) – 6
– काँग्रेस – 151
– राष्ट्रवादी (अजित पवार) – 83
– राष्ट्रवादी (शरद पवार) – 42
– शिवसेना ( ठाकरे) – 26
– बहुजन समाज पार्टी – 79
– वंचित बहुजन आघाडी – 31
– आम आदमी पार्टी – 63
– मनसे – 20
– एमआयएम – 16
– अपक्ष – 236
Jan 16, 20266:49 AM IST

Pune Municipal Corporation Result: पुण्यात 52 टक्केच मतदार, पुणेकरांची नाराजी की आणखी काही?

पुण्यात ५२.४२ टक्के मतदान पार पडले आहे. काल उशिरा टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. १६३ जागांसाठी ५२.४२ टक्के मतदान एकूण ३५ लाखापैकी १८ लाख ६२ हजार ४०८ जणांनी बजावला मतदानाचा हक्क. सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी भागात ४५.१२,
तर सर्वात जास्त मतदान. प्रभाग क्रमांक ३३ धायरी,शिवणे खडकवासलामध्ये ५७.८१  2017 मध्ये 55.56 टक्के झाले होते मतदान
Jan 16, 20266:47 AM IST

महानगरपालिका निवडणूक निकाल: धुरळा उडाला आता गुलाल कोण उधळणार?

राज्यातील 29 महापालिकांसाठी आज प्रत्यक्ष मतमोजणी होत आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनर, नागपूर, कोल्हापूरसह अनेक महापालिकांमध्ये दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले होते. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या निवडणुकीत मतदार राजानं कुणाला कौल दिला आहे. कोणत्या पक्षाची महापालिकेत सत्ता येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 Live: पिंपरी चिंचवडमध्ये मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल