विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरात तयारी सूरू आहे. त्याच आदित्य ठाकरेंची काही दिवसांवरच संभाजीनगरमध्ये सभा पार पडणार आहे. पण सभेआधीच ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे 2 माजी नगरसेवक आणि 12 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्या अंतर्गत गटबाटबाजीला कंटाळून या पदाधिकाऱ्याने राजीनामे दिले आहेत. तसेच पुढे आम्ही हिंदुत्वासाठी काम करणार आहेत. नेमका कुणाचं काम करणार हे दोन-तीन दिवसात सांगू असं देखील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
वरळीत शिंदेंना मोठा झटका
वरळी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.कारण शिंदे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना युबीटीत प्रवेश केला आहे. शिंदे गटाच्या उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, शाखा प्रमुख संतोष शिंदे, शाखाप्रमुख श्रीकांत जावळे, अनवर दुर्रानी (शिंदे गट) यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मातोक्षीवर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशाने शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
