महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली आहे.या बैठकीतन रमेश चेन्निथला यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी बंडखोरांचे पक्षातून ६ वर्षासाठी निलंबन करण्यात आल्याची माहिती दिली.तसेच राज्यात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही आहे, असे देखील चेनिथला यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच महाविकास आघाडीचा जाहिरनामा येत्या १० नोव्हेंबरला मल्लिकार्जुन खऱगे यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. ह्यात हॉटेलमध्ये हा जाहीरनामा जाहीर होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रमेश चेन्निथल्ला यांनी दिली.
advertisement
याचसोबत रमेश चेन्निथल्ला यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या महाराष्ट्रातल्या प्रचाराच्या तारखा देखील सांगितल्या आहेत. प्रियंका गांधी १३ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबरला निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. तर राहुल गांधी हे ४ दिवस राज्यातील प्रचारात सहभागी होणार आहेत. राहुल गांधी १२ नोव्हेंबर, १४ नोव्हेंबर आणि १६ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. तसेच मल्लिकार्जुन खरगे हे 13-14-17-18 नोव्हेंबरला राज्यात प्रचार करणार आहेत, अशी माहिती रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.
दरम्यान काँग्रेसने पर्वती विधानसभा मतदार संघातून आबा बागुल, कसबा मतदार संघातून कमल व्यवहारे, शिवाजी नगर मतदार संघातून मनीष आनंद या नेत्यांचवर कारवाईचा बडगा उगारला आहे.आणि त्यांचे सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन केले आहे.
