मनोज जरांगे पाटील एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे आणि कालिचरण महाराजांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मी कट्टर हिंदू आहे. छत्रपतींच हिंदुत्व मानणारा आहे आणि ज्यांनी पक्षाचा ठेका घेतलाय, त्यांच्याबद्दल नाही बोलणार नाही, असा टोला मनोज जरांगेंनी कालिचरण महाराजांना लगावला.
जरांगे पुढे म्हणाले, आम्ही ज्या हिंदुत आहोत त्यातला कट्टर वर्ग मराठा आहे. तो आज अडचणीत आहे. आम्ही आरक्षण मागतो म्हणून त्याचा पक्ष पाडा असे म्हणत नाही, किंवा जातीवादही करत नाही. पण वाकटी तिकटी टिकली लावल्याने तुम्ही धर्माचे रक्षक होत नाही. हे फक्त टीकल्या लावून हिंडणारे आहेत. सुपाऱ्या घेणारे आहेत. याला नारळ पाहिजे, पैसे पाहिजे, जेवायला चांगले पाहिजे,गरीबाचे कष्टाचे, गरीबाचे कष्टाचे, अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी कालिचरण महाराजांवर केली आहे.
advertisement
आमच्या मराठ्यांच्या समस्या त्यांना समजूत घ्यायच्या नाहीत. आमची लेकरं फाशी घेतातय. कदाचित त्याला आपला पक्ष चालवायचाच आणि त्याला पुढे तिकीट मिळणार असावं.पण एका जातीविषयी महाराजांच असं मतं आहे, हे मतदानाआधी कळालं हे बरंच झाल,असे देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.तसेच आणखीण एखादी टीकली लाव मागून एखादी लावं,असा चिमटा देखील मनोज जरांगेनी कालिचरण महाराजांना काढला आहे.
कालिचरण महाराजांच विधान काय?
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात संजय शिरसाट यांच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात कालीचरण महाराज आले होते. त्यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर वादग्रस्त भाषेत विधानं करत टीका केली. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे इकडे एक आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनाची खूप जोरदार हवा होती.मुंबईत तुफान गर्दी झाली होती. त्यांच्या नेत्याने दर्ग्यावर जाऊन चादर चढवली. जातीवरुन आरक्षण मागत होता. आरक्षण वगैरे नाही, त्याला हिंदुत्व तोडायचे होते. हिंदुत्व तोडायला निघालेला हा राक्षस आहे असं कालीचरण महाराज भाषणादरम्यान म्हणाले होते.
