नागपूरमध्ये काँग्रेसच्या संविधान बचाओ कार्यक्रमात माध्यमांना बंदी घालण्यात आली. याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी आता काँग्रेसी राहिले नाहीत. ते कम्युनिस्ट ते आता कट्टरपंथी विचारधारेकडे वळले आहेत. ओरिजनल निळ्या रंगा ऐवजी ते लाल रंगाचं कव्हर असलेली संविधानाची प्रत दाखवत असतात.
अराजक पसरवणाऱ्या आणि बंदी असलेल्या नक्षलवाद्यांच्या गराड्यात ते असतात. त्यांची धोरणं ठरवतात आणि नरेटिव्ह सेट करतात.
advertisement
भारत जोडो सुरू केलं होतं तेव्हा चांगली योजना आहे वाटलं होतं. किमान भारत त्यांच्या अजेंड्यावर आहे. पण १८० अशा संघटनांनी त्यात भाग घेतला होता ज्यामध्ये अराजकता पसरवणारे होते. हे रेकॉर्डवर आहे. राहुल गांधींनी एका हातात संविधान धरलंय तर त्यांचं काम मात्र अराजकता पसरवणारं आहे असंही फडणवीस म्हणाले.
नागपूरमध्ये संविधान बचाओ कार्यक्रमात माध्यमांना प्रवेश नसल्याच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले की, लोकशाही वाचवायची असं बोलतात पण लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या माध्यमांना संविधानावर होणाऱ्या बैठकीपासून दूर ठेवतात. त्यांचा खोटा मुखवटा निसटत असून खरा चेहरा दिसत आहे.
राहुल गांधी आणि नाना पटोले भाजपचंच काम करतायत
संविधानाला धोका असल्याच्या त्यांच्या नरेटिव्हचा आम्हाला पर्दाफाश करावा लागला नाही. आरक्षण संपवण्याची मागणी करून आणि अमेरिकेत खोटं बोलून राहुल गांधींनी भाजपचंच काम केलं. तर राज्यात नाना पटोले त्यांचीच री ओढत आहेत. दोघेही अजाणतेपणे भाजपच काम करतायत असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
