शिंदे गटाच्या उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, शाखा प्रमुख संतोष शिंदे, शाखाप्रमुख श्रीकांत जावळे, अनवर दुर्रानी (शिंदे गट) यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मातोक्षीवर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशाने शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
खरं तर वरळी मतदार संघातून महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर मनसेने या मतदार संघातून संदीप देशपांडे यांना तिकीट दिलं होतं. आणि एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. पण वरळीत शिंदे गटातून स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी जोर धरत होती. आणि आदित्य ठाकरे वगळता शिंदे आणि मनसेचे उमेदवार हे आयात उमेदवार होते.याच कारणामुळे आता शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युबीटीत प्रवेश केला आहे.
advertisement
दरम्यान वरळीमधून आदित्य ठाकरेंना मनसेचे संदीप देशपांडे आणि शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांचे तगडे आव्हान असणार आहे.दोन्ही ही ताकदीचे उमेदवार आहेत. संदीप देशपांडेचे नाव तर उमेदवारी यादी आधीच राज ठाकरेंनी वरळीच्या व्हिजनमध्ये सभेत जाहीर केले होते. यावरून ते आदित्य ठाकरेंविरूद्ध किती तयारीने उतरले होते.हे स्पष्ट होते. त्याचसोबत शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा हे देखील सुशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंसमोर या उमेदवाराचे तगडं आव्हान असणार आहे.
