महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असली तरी मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य पक्ष हे काही मतदारसंघातील मतांचे गणित बिघडवू शकतात.
advertisement
शंखनाद..! निवडणूक जाहीर होतात देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट चर्चेत
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी इंडिया आघाडीला 31 तर एनडीएला 17 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली. भाजपने 23 जागा गमावल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 जागा मिळाल्या होत्या.
महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीला चांगली टक्कर दिली होती. आता विधानसभेतही हा इम्पॅक्ट पाहायला मिळणार की लाडकी बहीण योजना वरचढ ठरणार याची उत्सुकता आहे. विकास कामांचा धडाका की विरोधकांचे खडेबोल जनता कुणाला कौल देणार याचा फैसला मतदारराजा घेणार आहे.
राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून उमेदवारी अर्ज 22 ऑक्टोबरपासून भरण्यास सुरुवात होणार आहे.
20 नोव्हेंबरला निवडणूक, 23 तारखेला निकाल, पण महायुती-महाविकास आघाडीसाठी 4 नोव्हेंबर का महत्त्वाची?
> कोणत्या टप्प्यात कुठं मतदान?
राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.
निवडणूक निकाल?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.
2019 च्या निवडणूक निकालानंतरचे पक्षीय बलाबल एकूण जागा -288
भाजप - 108
शिवसेना - 56
राष्ट्रवादी - 54
काँग्रेस - 44
बविआ - 3
मनसे - 1
एमआयएम - 2
समाजवादी पक्ष - 2
प्रहार - 2
जनसुराज्य - 1
स्वाभिमानी शेतकरी पक्ष - 1
शेकाप - 1
रासप - 1
माकप - 1
क्रांतिकारी शेतकरी पक्ष - 1
अपक्ष - 13
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरचे संख्याबळ...
भाजप- 105
शिवसेना शिंदे - 40
राष्ट्रवादी-अजित पवार- 39
शिवसेना ठाकरे - 15
राष्ट्रवादी शरद पवार- 13
मतदारांची आकेडवारी...
एकूण मतदार- 9 कोटी 59 लाख
नवमतदार- 19 लाख 48 मतदार
पुरुष मतदार-4 कोटी 59 लाख
महिला मतदार -4 कोटी 64 लाख
दिव्यांग मतदार- 6 लाख 32 हजार
85 वर्षांवरील मतदार- 12 लाख 48 हजार
शंभरी ओलांडलेले मतदार- 49 हजाराहून अधिक