शाळांसाठी महत्त्वाची प्रक्रिया: राज्यातील सर्व माध्यमिक शाळांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.mahahsscboard.in) ही प्रवेशपत्रे 'लॉगिन' करून डाउनलोड करता येतील. शाळांनी हे हॉल तिकीट प्रिंट करून, त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का आणि स्वाक्षरी घेऊन ती विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. विशेष म्हणजे, हॉल तिकीटची प्रिंट काढून देण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना मंडळाने दिल्या आहेत.
advertisement
Pune Traffic: पुण्यात 19 जानेवारीला शाळा, कॉलेजला सुट्टी, मार्गातही बदल, नेमकं असं काय घडतंय?
हॉल तिकीटवरील विद्यार्थ्याचे नाव, फोटो, सही किंवा विषयामध्ये काही त्रुटी किंवा चुका असल्यास, शाळांना त्या ऑनलाइन पद्धतीने दुरुस्त करता येतील. मात्र, जर फोटो किंवा स्वाक्षरीमध्ये बदल करायचा असेल, तर शाळांनी त्या दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे प्रत्यक्ष जाऊन करून घेणे आवश्यक आहे.
परीक्षेचे वेळापत्रक: दहावीची मुख्य परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांनी आपली हॉल तिकिटे शाळेतून वेळेवर प्राप्त करून घ्यावीत आणि त्यावरील माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.
