गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू व सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाने उपरोक्त निर्णय घेतला आहे.
गुटखा विक्रीच्या रॅकेटमध्ये शासकीय अधिकारी, त्यांना मी सोडणार नाही-झिरवाळ
advertisement
बनावट सुपाऱ्या बनवून गुटखा निर्मिती होत आहे. तसेत माणसे जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाला सुपारीचा आकार देऊन त्याला रंग आणि केमिकल वापरून सुगंधित केले जात असल्याचेही
नरहरी झिरवाळ म्हणाले. अनेक अधिकारी यात सहभागी आहेत, त्यांच्यावर मी कारवाई केली आहे. दोषी अधिकाऱ्यांना मी सोडणार नाही, असा इशारा देतानाच गुटख्यामुळे नपुसंकत्व येण्यासारखी भीषण समस्या निर्माण झाल्याकडे झिरवाळ यांनी लक्ष वेधले.
गुटखाबंदीची राज्यात कडक अंमलबजावणी
यापुढच्या काळात राज्यात गुटखाबंदीची राज्यात कडक अंमलबजावणी होईल. त्यासाठी या व्यापारातील सूत्रधारांना ‘मकोका’ लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. गुटखाबंदी विरोधात जिल्हास्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
